डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथआउट सोशल’वर पोस्ट करून , हल्लेखोराला पकडण्यात आले आहे आणि परिस्थिती हाताळल्याबद्दल त्यांनी सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे कौतुक केले. ट्रम्प यांनी लिहिले, “वॉशिंग्टन, डीसीमध्ये काय शानदार संध्याकाळ होती. सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी उत्कृष्ट काम केले.”असे सांगितले.
\nनवीन तारीख लवकरच निश्चित केली जाईल Donald Trump:
\nडोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले, “मी कार्यक्रम सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता, परंतु मी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेन.” तथापि, नंतरच्या एका अपडेटमध्ये, ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी कार्यक्रमावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाईल. “मी कार्यक्रमाच्या सर्व प्रतिनिधींशी बोललो आहे आणि आम्ही ३० दिवसांच्या आत त्याचे पुनर्नियोजन करू,” असे ट्रम्प म्हणाले.