Donald Trump warning to Iran: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने तेल पुरवठा रोखण्याविरुद्ध कडक इशारा दिला आहे. जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा इराणशी सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिका आणि जगभरातील अनेक देशांमध्ये इंधनाच्या किमती वाढत आहेत. अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारे जहाजे रोखले आहेत. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ” तर वीस पट मोठा हल्ला करणार ” Donald Trump warning to Iran डोनाल्ड ट्रम्प यांनी तेलाच्या किमती वाढण्याबाबत त्यांच्या सोशल मीडियावर कडक इशारा दिला. त्यांनी याविषयी बोलताना,”जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा प्रवाह रोखणारी कोणतीही कारवाई केली तर अमेरिका ते सहन करणार नाही. ” असे म्हटले आहे. पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले ,”जर नाकेबंदी लादली गेली तर अमेरिका इराणवर मागील कोणत्याही हल्ल्यांपेक्षा वीस पट मोठा हल्ला करेल.” अशी उघडपणे धमकी दिली आहे. “आम्ही इराणचा नाश करू” Donald Trump warning to Iran ट्रम्प म्हणाले की जर इराणने तेल पुरवठा बंद केला तर अमेरिका अशा प्रकारे प्रतिक्रिया देईल की इराणला पुन्हा एक राष्ट्र म्हणून उभे राहणे कठीण होईल. फक्त मृत्यू, आग आणि क्रोध इराणला सहन करावं लागेल असे त्यांनी म्हटले. Donald Trump warning to Iran: मात्र , त्यांनी असेही म्हटले की त्यांना अशी परिस्थिती उद्भवणार नाही अशी आशा आहे. तसेच त्यांचा इशारा अनेक देशांसाठी फायदेशीर आहे, कारण ते मध्य पूर्वेतील तेलावर अवलंबून आहेत.असे सांगितले. होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने चिंता वाढली इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून, होर्मुझची सामुद्रधुनीतून आखाती देशांकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इराणने अनेक देशांमधून येणाऱ्या जहाजांना हा मार्ग बंद केला आहे. यामुळे जगाच्या अनेक भागात कच्च्या तेलाच्या कमतरतेबद्दल चिंता वाढली आहे. यामुळे अमेरिकेत ट्रम्पवर देशांतर्गत दबाव देखील वाढत आहे. युद्धाचा दुसरा आठवडा सुरु Donald Trump warning to Iran: अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला, ज्याने युद्ध सुरू केले. संघर्ष आता दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. इस्रायल आणि अमेरिका संयुक्तपणे इराणवर हल्ला करत आहेत. इराणने आखातातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले आहे. या संघर्षाचा परिणाम प्रदेशाच्या तेल उत्पादन आणि पुरवठ्यावर स्पष्टपणे दिसून येतो.