Donald Trump Oath Ceremony: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. तर जेडी वन्स यांनी अमेरिकेचे नवे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक माजी राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ट्रम्प यांचे संपूर्ण मंत्रीमंडळ, त्यांचे कुटुंब तसेच अनेक देशांचे प्रमुख आणि अनेक टेक कंपन्यांचे दिग्गज उपस्थित होते. यापूर्वी, मावळते अध्यक्ष जो बिडेन आणि जिल बिडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांचे व्हाईट हाऊसमध्ये चहापानासाठी स्वागत केले होते.
#WATCH | Chief Justice John Roberts administer oath to #DonaldTrump as the 47th US President
(Source – US Network Pool via Reuters) pic.twitter.com/ppxME2oKCh
— ANI (@ANI) January 20, 2025
अमेरिकेचा सुवर्णकाळ आता सुरू होत आहे – डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. अमेरिकेचा सुवर्णकाळ आता सुरू होत आहे. या दिवसापासून आपला देश जगभर चमकेल. हे प्रत्येक देशासाठी ईर्षेचे कारण असेल. ट्रम्प प्रशासनाच्या प्रत्येक दिवशी मी अमेरिका फर्स्ट नितीवर काम करेन. आमची स्वायत्तता कायम राहील. न्यायाचा तराजू समतोल राहील.
मुक्त, समृद्ध देश निर्माण करणे हे आमचे प्राधान्य असेल. अमेरिका लवकरच अधिक चांगल्या स्थितीत येईल. देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. या संधीचे सोने करण्याची अमेरिकेकडे मोठी संधी आहे.
#WATCH | Washington DC | After taking the oath, US President #DonaldTrump says, "…The golden age of America begins right now."
(Source – US Network Pool via Reuters) pic.twitter.com/5AX7w9jLXx
— ANI (@ANI) January 20, 2025