Donald Trump : भारताशी बऱ्याच काळापासून एकतर्फी संबंध; ट्रम्प यांची टीका

वॉशिंग्टन : चीनमधील एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीमुळे अमेरिका नाराज झालीआहे. एससीओ शिखर परिषदेनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताबद्दल मोठे विधान केले आहे. भारताशी बऱ्याच काळापासून एकतर्फी संबंध आहेत असे आता ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले, खूप कमी लोकांना हे समजते की आम्ही भारतासोबत खूप कमी व्यापार करतो, परंतु ते आमच्यासोबत खूप व्यापार करतात.
दुसऱ्या शब्दांत, ते आम्हाला मोठ्या प्रमाणात वस्तू विकतात, आम्ही त्यांचे सर्वात मोठे ग्राहक आहेत, परंतु आम्ही त्यांना खूप कमी विकतो. आतापर्यंत हे पूर्णपणे एकतर्फी संबंध राहिले आहेत आणि ते अनेक दशकांपासून चालू आहे. याचे कारण असे आहे की भारत आतापर्यंत आमच्यावर इतके उच्च शुल्क लादत आहे, जे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे.
आमचे उद्योग भारतात वस्तू विकू शकत नाहीत.ही पूर्णपणे एकतर्फी आपत्ती आहे! तसेच, भारत आपले बहुतेक तेल आणि लष्करी उत्पादने रशियाकडून खरेदी करतो, अमेरिकेकडून फारच कमी. त्यांनी आता त्यांचे शुल्क पूर्णपणे कमी करण्याची ऑफर दिली आहे, परंतु खूप उशीर झाला आहे. त्यांनी हे वर्षांपूर्वीच करायला हवे होते. लोकांनी विचारात घेण्यासाठी काही सोप्या गोष्टी असे ट्रम्प म्हणाले.





