Donald Trump on “Third World“। अमेरिकेच्या वॉशिंग्टन, डीसीमध्ये झालेल्या गोळीबारानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर ट्रम्प यांनी त्यांचे प्रशासन “‘थर्ड वर्ल्ड” मधून म्हणजेच तिसऱ्या जगातून येणाऱ्या स्थलांतरितांना देशात कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी आपला हा निर्णय अमेरिकन व्यवस्था पूर्णपणे बरी करण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी असल्याचेही म्हटले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, “जरी आपण तंत्रज्ञानात प्रगती केली असली तरी, इमिग्रेशन धोरणांनी अनेकांसाठी ते फायदे आणि राहणीमान नष्ट केले आहे. मी सर्व तृतीय जगातील देशांमधून होणारे स्थलांतर कायमचे थांबवीन, ज्यामुळे अमेरिकन व्यवस्था पूर्णपणे बरी होऊ शकेल. मी बायडेनच्या नेतृत्वाखाली लाखो बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढेन.” असे म्हटले आहे. ट्रम्प आता कोणाला हद्दपार करणार ? Donald Trump on “Third World”। ट्रम्प यांनी असेही म्हटले की “जो व्यक्ती अमेरिकेच्या कामाचा नाही त्याला हद्दपार केले जाईल.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लिहिले, “जो अमेरिकेच्या कामाचा नाही किंवा ज्याला आपल्या अमेरिकेबद्दल कोणतीही आत्मीयता नाही त्याला मी देशातून बाहेर काढेन ” मी आपल्या देशातील नागरिक नसलेल्यांसाठी सर्व संघीय फायदे आणि अनुदाने काढून टाकीन. मी जनतेवर ओझे असलेल्या प्रत्येक परदेशी नागरिकाला हद्दपार करेन.” असे म्हणत आणखी कठोर निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी तिसऱ्या जगातील (थर्ड वर्ल्ड) देश कोणाला म्हटले? Donald Trump on “Third World”। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये “तिसऱ्या जगातील (थर्ड वर्ल्ड) देश” असा उल्लेख केला. हा शब्द अत्यंत वादग्रस्त मानला जातो. शीतयुद्धाच्या काळात त्याचा वापर सुरू झाला. “तिसऱ्या जगातील” (थर्ड वर्ल्ड) हा शब्द जगाला तीन भागात विभागण्यासाठी वापरला जात असे. “पहिल्या जगात” अमेरिका आणि नाटोचे सहयोगी मानले जाणारे देश समाविष्ट होते. “दुसऱ्या जगात” सोव्हिएत युनियन आणि वॉर्सा कराराचे सहयोगी मानले जाणारे देश समाविष्ट होते. तिसऱ्या जगात कोणत्याही गटाचा भाग नसलेले देश समाविष्ट होते. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या गटाचा भाग मानले जात होते.