Donald Trump on Third World। अमेरिकेच्या वॉशिंगटन डीसीमध्ये झालेल्या गोळीबारानंतर अमेरिकन प्रशासनाने त्यंत कठीण निर्णय घेत तिसऱ्या जगातील लोकांना देशात बंदी घातली आहे. दरम्यान, या मोठ्या घडामोडीवर संयुक्त राष्ट्रांच्या अनेक एजन्सींनी वारंवार आवाहन करूनही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ‘तिसऱ्या जगातून’ अमेरिकेत येणाऱ्या लोकांना कायमचे थांबवायचे आहे. असे स्पष्ट मत पुन्हा एकदा ट्रम्प यांनी म्हटलय. सोशल मीडियावर अमेरिकन कायद्याचा उल्लेख करत ट्रम्प यांनी, जर हा कायदा अमेरिकेच्या हितासाठी असेल तर कोणत्याही गटातील किंवा देशातील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो असे त्यांनी म्हटलंय. व्हाईट हाऊसनं या कायद्याचाही उल्लेख केला आहे, ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष देशाच्या संरक्षणासाठी कोणतेही निर्बंध लादू शकतात. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने अफगाण पासपोर्ट असलेल्या सर्व प्रवाशांना व्हिसा देणे तात्पुरते थांबवले आहेत. त्यासोबतच त्यांचे इमिग्रेशन उपाय आणखी कडक केले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ट्विटरवर,”अफगाण पासपोर्ट असलेल्यांना कोणताही व्हिसा दिला जाणार नाही. त्यासोबतच अमेरिकन नागरिकांची सुरक्षा ही महत्वाची आहे.” असेही त्यांनी म्हटले आहे. गोळीबारानंतर घेतलेला निर्णय Donald Trump on Third World। बुधवारी व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात दोन नॅशनल गार्ड सैनिक जखमी झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. त्यापैकी एक सैनिक, सारा बेक्स्ट्रम, हिचा नंतर मृत्यू झाला. अफगाण नागरिक रहमानउल्लाह लकनवालवर हल्ल्याचा आरोप आहे आणि आता त्याच्यावर प्रथम श्रेणीच्या खूनाचे आरोप आहेत. इमिग्रेशन विभागाने काय म्हटले? Donald Trump on Third World। अमेरिकन इमिग्रेशन विभागाने,”सध्या शरणार्थ्यांवर कोणताही अंतिम निर्णय घेतला जाणार नाही. प्रत्येक अर्जदाराची कठोर पुनर्तपासणी केली जाणार आहेत असे सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, “सर्व अर्जदारांची कसून तपासणी झाली आहे याची पुष्टी झाल्यानंतरच ही बंदी उठवली जाणार आहे.” ट्रम्प यांनी,”अमेरिका आता तिसऱ्या जगातील देशांमधून होणारे स्थलांतर थांबवू इच्छिते यामुळे बेकायदेशीर प्रवेश बंद होईल आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल” असे ते म्हणाले.