Donald Trump : इराणने आगोदर स्वतःची आर्थिक स्थिती सुधारावी. कारण इराण सध्या आर्थिक दृष्ट्या कोसळण्याच्या स्थितीत आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे. इराणने अलिकडेच पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेसमोर मांडलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिक्रिया देताना ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमधून ही टिप्पणी केली आहे. इराणकडून अण्वस्त्रांबाबतच्या वाटाघाटी ज्या पद्धतीने केल्या जात आहेत, त्यावरही ट्रम्प (Donald Trump) यांनी जोरदार टीका केली आहे. शांतता करार करण्यात इराणला अपयश आले आहे, असे ते म्हणाले. अणू कार्यक्रम आणि शांतता करार या दोन्ही गोष्टी इराण एकाच वेळी करू शकणार नाही. अण्वस्त्रांशिवायच्या शांतता करारावर स्वाक्षरी कशी करायची हे मला समजत नाही. इराणने लवकरात लवकर शहाणे व्हायला हवे, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केलेले स्वतःची एक प्रतिमाही पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी एका हातात बंदूक दिसते आहे. तर मागे स्फोट होत असल्याचे दिसते आहे. नो मोअर मिस्टर नाईस गाय, अशी कॅप्शनही दिली गेली आहे. Donald Trump युद्ध सुरू होण्याच्या आगोदरपासूनच इराणच्या अणू कार्यक्रमावरून अमेरिका-इराणमध्ये तणाव निर्माण झाला होता. इराणला अण्वस्त्रे बनवता येऊ शकणार नाहीत, असे ट्रम्प (Donald Trump) वारंवार म्हणाले आहेत. तर इराणचा अणू कार्यक्रम हा केवळ शांततेसाठी असल्याचा दावा इराणकडून सातत्याने केला जातो आहे. पण अणू बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक तेवढे युरेनियमही इराणने समृद्ध केले आहे. इराणचे समृद्ध युरेनियम अजूनही इसफहान अणू प्रकल्पाच्या ठिकाणीच आहे, असे समजते आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अणू उर्जा एजन्सीचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी म्हटले आहे. याच ठिकाणी गेल्या वर्षी अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे हवाई हल्ले केले होते, पण या हल्ल्याचे परिणाम दर्शवणारे काही फोटो उपग्रहाद्वारे प्राप्त झाले आहेत. उपग्रहाच्या फोटोंमध्ये अजूनही युरेनियमच्या साठ्यांची माहिती मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रति डॉलर इराणी रियालचे मूल्य १.८ दशलक्ष इराणच्या रियालचे प्रचंड अवमूल्यन झाले असून प्रति डॉलर रियालची किंमत १.८ दशलक्ष इतकी झाली आहे. युद्ध सुरूअसताना रियालची किंमत स्थिर होती. कारण त्या काळात थोडी फार तरी आयात-निर्यात सुरू होती. पण अमेरिकेकडून सागरी नाकाबंदी सुरू झाल्यावर इराणचे व्यवहार ठप्प झाले आहेत. दोन दिवसांपुर्वीपासून रियालची घसरण सुरू झाली होती. ज्या देशात अन्न आणि औषधांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि कच्च्या मालापर्यंत अनेक आयात वस्तू डॉलरच्या दरामुळे प्रभावित होतात, तिथे रियालच्या घसरणीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.