Donald Trump : इराणने नाकारला ट्रम्प यांचा ‘तो’ प्रस्ताव

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अणु चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या ऑफरला नकार दिला आहे आणि अमेरिकेने इराणच्या अणु क्षमता नष्ट केल्याचा ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला. जूनमध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या आण्विक प्रकल्पांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी केलेल्या १२ दिवसांच्या हवाई मोहिमेनंतर अप्रत्यक्ष वाटाघाटींच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत.
त्यानंतर खामेनी यांनी हे विधान केले आले. इराणच्या अणुकार्यक्रमात अमेरिकेच्या हस्तक्षेपाचाही खामेनी यांनी निषेध केला. ट्रम्प यांचा हा प्रयत्न म्हणजे जबरदस्ती लादली जाणारी कृती आणि बेकायदेशीर हस्तक्षेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाश्चिमात्य देश इराणवर गुप्तपणे अण्वस्त्रे बनवण्याचा आरोप करत आहेत. तर अराण करत असलेले युरेनियम समृद्धीकरण नागरी ऊर्जेच्या वापरासाठी असल्याचा इराणचा दावा आहे.
दुसरीकडे इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दोषी आढळलेल्या एका व्यक्तीला इराणने कोम शहरात फाशीची शिक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल कायम ठेवल्यानंतर आणि माफीची विनंती नाकारल्यानंतर शनिवारी पहाटे या व्यक्तीला फाशी देण्यात आली. त्या व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही. त्या व्यक्तीवर इस्रायलशी गुप्तचर सहकार्याचा आरोप होता आणि तो पृथ्वीवरील भ्रष्टाचार आणि देवाविरुद्ध शत्रुत्वाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला होता. या गुन्ह्यात इराणच्या इस्लामिक दंड संहितेनुसार मृत्युदंडाची शिक्षा आहे.





