Donald Trump: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्ध थांबणार? ; ट्रम्प ‘या’ व्यक्तीसोबत चर्चा करून शेवटचा निर्णय घेणार
Donald Trump: जागतिक स्तरावर चिंतेचा विषय ठरलेल्या इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीअत्यंत महत्वाचे विधान केले आहे.

Donald Trump: जागतिक स्तरावर चिंतेचा विषय ठरलेल्या इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीअत्यंत महत्वाचे विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाला थांबवण्यासंबंधी महत्चाचे संकेत दिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाविषयी बोलताना,”इराणसोबतचे युद्ध कधी संपवायचे, याचा निर्णय मी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करून एकत्रितपणे घेईन,” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
योग्य वेळी अंतिम निर्णय देईन Donald Trump:
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. त्यांनी यावेळी बोलताना, युद्धाचा अंत हा एक ‘म्युच्युअल’ (परस्पर) निर्णय असेल. आम्ही सातत्याने संपर्कात आहोत आणि योग्य वेळ आल्यावर मी अंतिम निर्णय देईन. जर मी आणि नेतन्याहू यांनी वेळीच पाऊल उचलले नसते, तर इराणने इस्रायलचा विनाश केला असता. आता आम्ही त्यांना अशा स्थितीत आणले आहे की ते पुन्हा डोके वर काढू शकणार नाहीत.” असे म्हणत अमेरिका आणि इस्रायलच्या मजबूतस्थितीची माहिती दिली.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा इराणने मोजतबा खामेनेई यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे. ट्रम्प यांनी मोजतबा यांचे ‘लाईटवेट’ म्हणून वर्णन करत अमेरिकेच्या मान्यतेशिवाय ते फार काळ टिकणार नाहीत, असा थेट इशाराही दिला आहे.
कतारचे युद्ध थांबवण्याचे प्रयत्न… Donald Trump:
दरम्यान, कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी सर्व देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले असून, इराणने खाडी देशांवरील हल्ले तातडीने थांबवावेत, अशी विनंती केली आहे. कतार सातत्याने इराणच्या संपर्कात असून या प्रदेशातील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करत आहे.
गेल्या काही दिवसांतील युद्धाच्या घटनांमुळे इराणसोबतच्या विश्वासाला मोठा तडा गेल्याचे त्यांनी मान्य केले. विशेषतः अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे परिस्थिती बिघडली आहे, असे ते म्हणाले. इराणने सर्वात आधी खाडी देशांवर आणि या युद्धात थेट सहभागी नसलेल्या देशांवर होणारे हल्ले थांबवले पाहिजेत, असे ते म्हणाले.






