Donald Trump: इराणबद्दल ट्रम्प यांचा धक्कादायक दावा ; युध्दाबाबत दिले ‘हे’ महत्वाचे संकेत
Donald Trump: अमेरिका आणि इराण यांच्यात बऱ्याच काळापासून युद्ध सुरू आहे.

Donald Trump: अमेरिका आणि इराण यांच्यात बऱ्याच काळापासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांचे मोठे नुकसान होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध संपवण्याची शपथ घेतली आहे. त्यांनी इराणबद्दल असा दावाही केला आहे की, हे युद्ध लवकरच संपू शकते.
युद्ध लवकरच संपेल Donald Trump:
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणमध्ये एक अत्यंत महत्त्वाची मोहीम सुरू केली. ही एक अत्यंत महत्त्वाची मोहीम होती कारण ते अणुबॉम्ब बाळगू शकत नाहीत. मला वाटते की युद्ध लवकरच संपेल; मला नाही वाटत की ते जास्त काळ टिकेल.”
डोनाल्ड ट्रम्प यांना जीवितहानी नको
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच युद्धाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, “आम्ही त्यांच्यावर हल्ला करत आहोत. मला तडजोड करणे अधिक पसंत आहे कारण मला जीवितहानी नको आहे.
आम्ही दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या हल्ल्यासाठी तयार होतो. त्यांनी मला फोन करून सांगितले, ‘कृपया असे करू नका, आपण बोलूया.'” त्यावर ते म्हणाले, “मी असे कधीच म्हटले नाही.” ते आमचा आदर करतात… इराण अणुबॉम्ब बाळगू शकत नाही.
कराराचा मसुदा तयार
अमेरिका-इराण कराराचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. तथापि, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या सहमतीनेच हा तणाव कमी होऊ शकतो.
कतारच्या अधिकाऱ्यांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य कराराच्या मसुद्यावर चर्चा सुरू असून, ही प्रक्रिया बरीच प्रगत झाली आहे. त्यांनी यावरही जोर दिला की, हा एक अल्पकालीन राजनैतिक तोडगा आहे.
हे युद्ध किती काळापासून सुरू आहे? Donald Trump:
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध सहा महिन्यांत संपणार आहे. याची सुरुवात फेब्रुवारी २०२६ मध्ये झाली, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर मोठ्या प्रमाणावर संयुक्त हवाई हल्ले करून सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार केले.
युद्धविरामाबाबत बोलायचे झाल्यास, एप्रिल २०२६ मध्ये दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानंतर जून २०२६ मध्ये अल्प कालावधीसाठी पुन्हा युद्धविरामाची घोषणा करण्यात आली.






