Donald Trump : पश्चिम आशियातील स्थिती निवळण्याच्या दृष्टीने गुरूवारी महत्वाची घडामोड घडली. इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये १० दिवसांच्या युद्धविरामावर सहमती झाली. त्याविषयीची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली. इस्त्रायल आणि इराणचे समर्थन असणाऱ्या हिज्बुल्लाह दहशतवादी संघटनेत काही काळापासून संघर्ष सुरू आहे. त्यातून इस्त्रायलकडून (Donald Trump) हिज्बुल्लाहच्या लेबनॉनमधील ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. तो संघर्ष थांबवण्याच्या उद्देशातून इस्त्रायल आणि लेबनॉनच्या राजदूतांमध्ये अमेरिकेत दोन दिवसांपूर्वी चर्चा झाली. ती चर्चा फलदायी ठरल्याचे दिसून येत आहे. Donald Trump आता इस्त्रायल आणि लेबनॉनने तात्पुरत्या युद्धविरामाची (Donald Trump) तयारी दर्शवली आहे. तो निर्णय तातडीने लागू करण्यात आला. दोन्ही देशांतील युद्धविरामाच्या सहमतीला बळकटी देण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील आहेत. त्यांनी इस्त्रायल आणि लेबनॉनच्या नेत्यांना चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. ते स्वीकारले गेल्यास इस्त्रायल, लेबनॉनमध्ये वर्ष १९८३ नंतर प्रथमच उच्चस्तरीय चर्चा होईल. त्यातून युद्धविरामाला बळकटी मिळण्याची चिन्हे आहेत. संघर्षामुळे लेबनॉनमधील लाखों लोक विस्थापित झाले आहेत. त्यांना टिकाऊ स्वरूपाच्या युद्धविरामामुळे मोठा दिलासा मिळू शकेल.