Donald Trump। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने अमेरिकन बाजारपेठेत “डंप” करू नये (स्वस्त दराने तांदूळ विकू नये) आणि ते या समस्येवर “उत्तर देतील” असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला की ही “समस्या” शुल्क लादून सहजपणे सोडवता येईल. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये शेती आणि कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख सदस्यांसह बैठक घेतली. ज्यात ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट आणि कृषी सेक्रेटरी ब्रुक रोलिन्स यांचा समावेश होता. त्यांनी शेतकऱ्यांसाठी १२ अब्ज डॉलर्सची संघीय मदत देखील जाहीर केली. लुईझियाना याठिकाणी त्यांच्या कुटुंबाचा कृषी व्यवसाय, केनेडी राईस मिल्स चालवणाऱ्या मेरिल केनेडी यांनी ट्रम्प यांना सांगितले की देशाच्या दक्षिणेकडील भागातील तांदूळ उत्पादक “खरोखर संघर्ष करत आहेत” आणि इतर देश अमेरिकन बाजारपेठेत तांदूळ “डंप” करत आहेत, ते अत्यंत कमी किमतीत विकत आहेत. ट्रम्प यांनी विचारले की,” कोणते देश अमेरिकेला स्वस्त दरात तांदूळ विकत आहेत, तेव्हा अध्यक्षांच्या शेजारी बसलेले केनेडी उत्तर दिले, “भारत आणि थायलंड; अगदी चीनही प्यूर्टो रिकोला स्वस्त दरात तांदूळ विकत आहे. प्यूर्टो रिको अमेरिकन तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ होती. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्यूर्टो रिकोला तांदूळ पाठवलेला नाही.” केनेडी म्हणाले की ट्रम्प प्रशासनाने लादलेले शुल्क काम करत आहेत, “पण आपल्याला ते आणखी वाढवायला हवे.” भारताला हे करण्याची परवानगी का आहे? Donald Trump। ट्रम्पने नंतर बेझंटकडे वळून म्हणाले, “भारता, मला भारताबद्दल सांगा. भारताला हे करण्याची परवानगी का आहे? त्यांना टॅरिफ भरावे लागतात. त्यांना तांदळावर सूट आहे का?” यावर बेझंटने उत्तर दिले, “नाही, आम्ही सध्या त्यांच्याशी व्यापार कराराची वाटाघाटी करत आहोत.” केनेडी यांनी ट्रम्प यांना असेही कळवले की भारताविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेत (WTO) एक खटला प्रलंबित आहे. ट्रम्प म्हणाले की, ते “खूप सहजपणे” सोडवता येईल. ते पुढे म्हणाले, “बेकायदेशीरपणे वस्तू आयात करणाऱ्या देशांवर शुल्क लादून हे खूप लवकर सोडवले जाईल. तुमची समस्या एका दिवसात सुटेल, म्हणून आपल्याला सर्वोच्च न्यायालयात खटला जिंकायचा आहे.” भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश Donald Trump। भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघाच्या आकडेवारीनुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे, जो जागतिक बाजारपेठेत २८ टक्के वाटा उचलतो. २०२४-२५ मध्ये जागतिक निर्यातीत ३०.३ टक्के वाटा अपेक्षित असलेला तो एक अव्वल निर्यातदार देखील आहे. भारत जागतिक स्तरावर निर्यात करत असलेल्या तांदळाच्या जातींपैकी, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या बाजारपेठांमध्ये “सोना मसुरी” ला पसंती दिली जाते. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के शुल्क लादले आहे, जे जगातील सर्वाधिक आहे. यामध्ये रशियाकडून तेल खरेदीवर २५ टक्के शुल्क समाविष्ट आहे.