Dollar Vs Rupee: आखातातील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. यानंतर रुपया डॉलरच्या तुलनेत 82 पैशांनी घसरून 95.31 रुपये पति डॉलर या विक्रमी नीचांकी पातळीवर स्थिरावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचे आणि काटकसरीचे उपाय अवलंबण्याचे आवाहन केल्याने बाजारातील भावनांना आणखी धक्का बसला. परकीय चलन व्यापार्यांच्या मते, मजबूत होत असलेला अमेरिकी डॉलर आणि परकीय भांडवलाचा परतीचा प्रवास यामुळे स्थानिक चलनावर आणखी दबाव आला. हेही वाचा – एप्रिलमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 5% घटली; मध्य-पूर्वेतील तणावाचा परिणाम फिनरेक्स ट्रेझरी अॅडव्हायझर्स एलएलपीचे ट्रेझरी प्रमुख अनिल कुमार भन्साली म्हणाले, पंतप्रधान मोदींनी वित्तीय तूट कमी ठेवण्यासाठी परकीय चलन वाचवण्याकरिता पेट्रोल, सोने, परदेश दौरे इत्यादी खरेदी कमी करण्यास सांगितले आहे. या उपायांचा अल्पकालीन परिणाम म्हणजे विकासाचा वेग मंदावेल. सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक 0.13 टक्क्यांनी वाढून 98.02 अंकावर व्यवहार करत होता. क्रूडच्या किमतीत वायदे बाजारात 2.52 टक्क्यांनी वाढ होऊन ती प्रति बॅरल 103.8 डॉलरवर पोहोचली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 4,110.60 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. आरबीआयने शुक्रवारी सांगितले की, 1 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 7.794 अब्ज डॉलर्सने घसरून 690.693 अब्ज डॉलर्सवर आला आहे.