Tanushree Dutta : बॅालीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपला एक काळ गाजवला आहे. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे तनुश्री दत्ता. एकेकाळी बॅालीवूड इंडस्ट्रीमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. अभिनेता इमरान हाशमीसोबत ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटात तिने स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटात तनुश्रीने दिलेल्या इंटीमेंट सीनची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे अभिनेत्री प्रकाशझोतात आली. पण त्यानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय तनुश्री दत्ताने घेतला. अभिनेत्री तनुश्री दत्ता विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारलेल्या एका प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा होत आहे. लग्न करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न तनुश्रीला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, हो. लग्न करायचं आहे. तनुश्रीला एका संताने सांगितले आहे की, तिच्या नशिबात लग्न आणि मूल या दोन्ही गोष्टी आहेत. असे सांगत संताने सांगितलेली गोष्ट तिने शेअर केली. पिंकविल्हाला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने याबाबत सांगितले. ती म्हणाली, मला लग्न करायचे आहे. माझ्या नशीबातही आहे. मी कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते, तिथे मला एक 90 वर्षांच्या साधू भेटल्या. त्या 40 वर्षांपासून मां तारा यांच्या साधिका आहेत. त्या साधुंनी मला सांगितलं की मला एक मुलगा होईल. त्यावेळी मी त्यांना म्हटले की अजून माझे लग्नच झालेले नाही. आधी मला लग्नासाठी आशीर्वाद द्या, असे ती म्हणाली. पुढे ती म्हणाली, कारण लग्नाशिवाय काही झाले तर मोठी अडचण होईल. म्हणूनच मी रिलेशनशिपपासूनही दूर आहे. मला वाटते की मी अशाच व्यक्तीसोबत नात्यात राहावे जी लग्नासाठी तयार असेल. मला कोणतेही नाते गुंतागुंतीचे करायचं नाही, असेही तनुश्रीने स्पष्ट केले. हेही वाचा : ‘ही कसली फॅशन?’ गायिका नेहा कक्कर अनोख्या एअरपोर्ट लुकमुळे ट्रोल