Surendra Rajan : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील मकसूद भाई आठवतोय? 6 वेळा साकारली महात्मा गांधींची भूमिका, कारण आहे खास
Surendra Rajan : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील त्यांची छोटीशी भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.

Surendra Rajan : सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, काही कलाकारांच्या छोट्याशा भूमिका देखील प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात. असाच एक अभिनेता म्हणजे सुरेंद्र राजन.
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील त्यांची छोटीशी भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात सफाई कामगार म्हणून एका सीनसाठी असणारी भूमिका त्यांनी केली होती.
विशेष म्हणजे, या अभिनेत्याने पडद्यावर तब्बल सहा वेळा महात्मा गांधींची व्यक्तिरेखा साकारली आहे.
सहा चित्रपटांमध्ये साकारली महात्मा गांधींची भूमिका
सुरेंद्र राजन यांनी २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटातून पहिल्यांदा महात्मा गांधींची भूमिका साकारली. सुरेंद्र राजन यांची शरीरयष्टी आणि बोलण्याची शैली महात्मा गांधींच्या भूमिकेला अगदी साजेशी होती. म्हणूनच या भूमिकेसाठी त्यांची वारंवार निवड होत गेली.
त्यांनी ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’, ‘वीर सावरकर’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो’, ‘द लास्ट डेज ऑफ द राज’, ‘गांधी: द सायलेंट गन’ आणि ‘गुमनामी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महात्मा गांधींची व्यक्तिरेखा साकारली आहे.
‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील मकसूद भाईंनी जिंकली मनं
सुरेंद्र राजन यांची ओळख केवळ महात्मा गांधींच्या भूमिकेपुरती मर्यादित नाही. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी मकसूद भाई नावाच्या सफाई कामगाराची भूमिका साकारली होती.
चित्रपटातील त्यांची भूमिका छोटी असली तरी एका भावनिक प्रसंगामुळे ती प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. चित्रपटात संजय दत्तच्या ‘मुन्ना’ या पात्राचा मकसूद भाईंसोबत भावनिक संवाद होतो. मुन्ना त्यांच्या कामाचे कौतुक करतो आणि त्यांना मिठी मारतो. हा प्रसंग चित्रपटातील लक्षात राहणाऱ्या दृश्यांपैकी एक मानला जातो.
३७ वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रिय
मध्य प्रदेशचे रहिवासी असलेल्या सुरेंद्र राजन यांनी १९८९ मध्ये ‘इन विच ॲनी गिव्हज इट वन्स’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जवळपास ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपटात काम केले.
Dino Morea : मोठी बातमी! दिनो मोरियाला पोलिसांनी घेतले ताब्यात, नेमकं प्रकरण काय?





