Relationship Advice: डेटिंगमध्ये प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करता? जाणून घ्या 3P थिअरी; नात्यांकडे पाहण्याचा बदलू शकतो दृष्टीकोन
Relationship Advice ही थिअरी डेटिंगकडे वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवते. प्रत्येक डेट यशस्वीच झाली पाहिजे, असे नसते. प्रत्येक भेटीतून काही ना काही शिकायला मिळते, हा या थिअरीचा मुख्य उद्देश आहे.

Relationship Advice: आजच्या डिजिटल युगात डेटिंगची संकल्पना मोठ्या प्रमाणात बदलली आहे. पूर्वी डेटिंग म्हणजे एकमेकांना ओळखण्याची प्रक्रिया मानली जायची. मात्र आता डेटिंग अॅप्स, सोशल मीडिया आणि सतत वाढणारे पर्याय यामुळे नातेसंबंध अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. अनेक जण पहिल्या भेटीनंतर प्रत्येक छोट्या गोष्टीचा जास्त विचार करू लागतात. आपण काही चुकीचे बोललो का, समोरच्या व्यक्तीने मेसेज उशिरा का केला, आपले वागणे योग्य होते का, असे अनेक प्रश्न मनात सतत फिरत राहतात. अशा ओव्हरथिंकिंग करणाऱ्या लोकांसाठी सध्या 3P थिअरी चर्चेत आहे. (Relationship Advice)
ही थिअरी डेटिंगकडे वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवते. प्रत्येक डेट यशस्वीच झाली पाहिजे, असे नसते. प्रत्येक भेटीतून काही ना काही शिकायला मिळते, हा या थिअरीचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नातेसंबंधांवरील ताण कमी होतो आणि डेटिंगचा अनुभव अधिक सहज बनतो.
3P म्हणजे काय? (Relationship Advice)
3P म्हणजे Potential (संभाव्यता), Plot (कथा) आणि Practice (अनुभव). या तीन गोष्टींपैकी कोणत्याही एका निष्कर्षापर्यंत प्रत्येक पहिली भेट पोहोचते. त्यामुळे डेट पुढे गेली नाही तरी ती वाया गेली, असे मानण्याची गरज नसते.
Potential – नाते पुढे जाण्याची शक्यता (Relationship Advice)
पहिल्या भेटीत दोघांमध्ये चांगला संवाद झाला, एकमेकांसोबत वेळ छान गेला आणि पुन्हा भेटण्याची इच्छा निर्माण झाली, तर त्या नात्यात पुढे जाण्याची शक्यता असते. याचा अर्थ लगेचच जीवनसाथी मिळाला असा नसतो. मात्र दोघांची विचारसरणी जुळत आहे आणि एकमेकांना आणखी जाणून घेण्याची इच्छा आहे, हे त्यातून दिसून येते.

Dating In New Era
Plot – आयुष्यभर लक्षात राहणारी आठवण
प्रत्येक डेट यशस्वी होईलच असे नाही. काही वेळा समोरची व्यक्ती अपेक्षेप्रमाणे नसते. सोशल मीडियावरील व्यक्तिमत्त्व आणि प्रत्यक्ष स्वभाव यात फरक जाणवू शकतो. कधी संवाद जुळत नाही, तर कधी भेट अपेक्षेप्रमाणे होत नाही.
3P थिअरीनुसार अशा भेटीला अपयश मानण्याची गरज नाही. उलट ती एक मजेशीर किंवा लक्षात राहणारी आठवण बनू शकते. पुढे मित्रांसोबत सांगण्यासारखी एक कथा तयार होते. त्यामुळे नकार मिळाल्याचे दुःखही कमी होते.
Practice – प्रत्येक भेटीतून मिळणारा अनुभव
या थिअरीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अनुभव. प्रत्येक डेटमधून काहीतरी नवीन शिकायला मिळते. संवाद कसा साधावा, स्वतःच्या मर्यादा कशा ठरवाव्यात, समोरच्या व्यक्तीतील चांगल्या-वाईट गोष्टी कशा ओळखाव्यात आणि आपल्याला जोडीदारामध्ये नेमके काय हवे आहे, हे अशा अनुभवातून स्पष्ट होत जाते.
वेगवेगळ्या लोकांना भेटल्याने आत्मविश्वास वाढतो. तसेच प्रत्येक छोट्या गोष्टीवर जास्त विचार करण्याची सवय हळूहळू कमी होऊ लागते.
तरुणांमध्ये ही थिअरी लोकप्रिय का ठरत आहे?
आज डेटिंग अॅप्समुळे लोकांसमोर असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्य व्यक्ती निवडण्याचा ताणही वाढला आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर दिसणारे परफेक्ट रिलेशनशिपचे फोटो आणि व्हिडिओ अनेकांच्या अपेक्षा अवास्तव वाढवतात. अशा परिस्थितीत 3P थिअरी नात्यांकडे वास्तववादी आणि सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवते.
ही थिअरी सांगते की, प्रत्येक भेट यशस्वी व्हावीच असे नाही. प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे डेटिंग हा ताणाचा विषय न राहता आयुष्यातील शिकण्याचा आणि नवीन अनुभव घेण्याचा एक सुंदर प्रवास ठरू शकतो.

