Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या याच शैलीमुळे अनेकांकडून त्यांचे कौतुक केले जाते. नाना पाटेकर पुन्हा एकदा त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. नागपूर येथील आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नाना पाटेकर यांनी जात आणि धर्माच्या राजकारणावर भाष्य केले आहे. नागपुरातील जलसंवादासंदर्भातील कार्यक्रमात व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या जाहीर कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी “मी माझी जात कधीच कोणाला सांगितली नाही आणि मला त्याची गरजही वाटत नाही,” असं स्पष्ट मत यावेळी मांडलं. (Nana Patekar) नाना पाटेकर म्हणाले, “गडकरी साहेब, तुम्हाला माहितेय का माझी जात काय आहे? मी माझी जात कधीच कुणालाही सांगितली नाही. माझ्या आईनं मला लहानपणीच एक गोष्ट शिकवली होती, जी मी आजही पाळत आलोय. आई म्हणाली होती की, तुझी जात फक्त ‘माणूस’ हीच आहे आणि तुझा धर्म ‘माणुसकी’ आहे. त्यापलीकडं जाऊन स्वतःची ओळख सांगण्याची गरज नाही. Ram Charan: ‘पेद्दी’मुळे राम चरण भावूक; सलमान आणि आमिर खानचे मानले आभार जातीचा फरक आपण शेवटी कसा मिटवणार आपल्या ज्ञानाने, शिक्षणाने. (Nana Patekar) अभिनेते याबद्दल पुढे म्हणाले, “जात कधी संपणार नाही. तुम्ही संपल्या तरी त्या संपणार नाही. ऑफिसमध्ये बॉस राहणार. ती उच्च जात राहणार मग मध्ये दुसरी मग असं करत करत शेवटी शिपायाची. तर तुम्ही करता काय, तुमची पात्रता काय आहे त्याच्यावरुन आपली जात ठरते. कांबळी नावाचा आमचा बॉस मला आनंद होतो कांबळी माझा बॉस आहे. जातीचा फरक आपण शेवटी कसा मिटवणार आपल्या ज्ञानाने, शिक्षणाने. आज मोठ्या पदांवर इतकी छान मंडळी आहेत. त्यांची जात नाही कोणी विचारत. मला नाही कोणी विचारलं. तुम्हाला माहितीये का माझी जात? मी माझा जात नाही कधी कोणाला सांगितली आणि कोणी विचारलीही नाही.” Nana Patekar: “तुम्हाला माहितीये का माझी जात?”; नाना पाटकरांंचे गडकरींसमोर जाती आणि धर्मावर परखड मत देशात तसंच राज्यात आजच्या वातावरणावर भाष्य करताना नाना पाटेकर यांनी समाज आणि राजकारणात वाढणाऱ्या जातीयवादावर चिंता व्यक्त केली. आजकाल माणसाची ओळख त्याच्या कर्तृत्वावरून किंवा स्वभावावरून नाही, तर तो कोणत्या जातीत जन्मला यावरून ठरवली जात आहे, हे दुर्दैवी आहे. आपण आधी माणूस म्हणून एकत्र यायला हवं. जेव्हा आपण जात आणि धर्माच्या भिंती पाडू, तेव्हाच खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती होईल,” असंही नाना म्हणाले. याच कार्यक्रमात नानांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. गडकरी यांनी नेहमी जातीपाती पलीकडं जाऊन विकासाचे राजकारण केल्याचेही गौरवोद्गार काढले. … तर संपूर्ण भारत समृद्ध होईल (Nana Patekar) “आपली एकत्र ही चळवळ म्हणजे केवळ बोलण्यासाठी, भाषणापुरती तसं नाही, आतून ते यायला पाहिजे. माझ गावच आपला भारत आहे आणि तेवढ्या पुरता करा, प्रत्येकाने तेवढ केलं म्हणजे संपूर्ण भारत समृद्ध होईल. पण हे केले की त्याचं श्रेय मग त्यातील स्पर्धा, तुलना त्यातून मग मी तुमच्या पेक्षा जास्त कसा श्रेष्ठ… काही गरज नाही ना…” असे म्हणत नानांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. हेही वाचा: Ram Charan: ‘पेद्दी’मुळे राम चरण भावूक; सलमान आणि आमिर खानचे मानले आभार