Hiccups: उचकी लागली की अनेकजण लगेच म्हणतात, “कोणी तरी तुमची आठवण काढत आहे.” ही गोष्ट ऐकायला मजेशीर वाटत असली तरी त्यामागे कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. प्रत्यक्षात उचकी येण्यामागे काही शारीरिक कारणे असतात. अनेक वेळा उचकी काही मिनिटांत आपोआप थांबते, पण काही वेळा ती सतत येत राहिल्याने त्रास होऊ शकतो. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. तज्ज्ञांच्या मते, उचकी येण्याचे मुख्य कारण म्हणजे डायफ्राम या स्नायूमध्ये अचानक आकुंचन होणे. डायफ्राम हा छाती आणि पोट यांच्या मधला महत्त्वाचा स्नायू आहे, जो श्वास घेण्याच्या प्रक्रियेत मदत करतो. या स्नायूमध्ये अचानक हालचाल झाली की उचकी सुरू होते. याशिवाय गॅस, अपचन, खूप पटकन खाणे किंवा पिणे, तिखट पदार्थ खाणे यामुळेही उचकी लागू शकते. (Hiccups) उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय (Hiccups) हिंग आणि तूप पोटात गॅस झाल्यामुळे उचकी येत असेल तर हा उपाय उपयोगी ठरू शकतो. एक चमचा तूप हलके गरम करून त्यात थोडी हिंग मिसळा. हे मिश्रण ताकात टाकून प्यायल्यास आराम मिळू शकतो. काळी मिरी आणि साखर दोन ते तीन काळी मिरी आणि थोडी साखर एकत्र चावून खाल्ल्यास उचकी कमी होण्यास मदत मिळते. हा जुना आणि सोपा उपाय मानला जातो. Hiccups थंड पाण्याचा वापर उचकी सतत येत असेल तर थंड पाण्याने गुळण्या करणे उपयोगी ठरू शकते. थंड पाण्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि उचकी थांबण्यास मदत होते. पेपर बॅग तंत्र एक पेपर बॅग घेऊन त्यात तोंड आणि नाक ठेवून हळूहळू श्वास घ्यावा आणि सोडावा. यामुळे श्वासोच्छ्वास नियंत्रित होण्यास मदत मिळते. मात्र प्लास्टिकची पिशवी वापरू नये. जीभ बाहेर काढण्याचा उपाय काही वेळा जीभ हलके बाहेर ओढल्याने घशातील स्नायूंवर परिणाम होतो आणि उचकी थांबू शकते. हा उपाय अनेकजण वापरतात. लक्ष दुसरीकडे वळवणे जुन्या लोकांच्या मते, अचानक एखादी धक्कादायक किंवा लक्ष विचलित करणारी गोष्ट सांगितल्यास उचकी थांबू शकते. यामागे मेंदूचे लक्ष दुसरीकडे वळण्याचा परिणाम असू शकतो. तज्ज्ञ सांगतात की, अधूनमधून येणारी उचकी सामान्य असते. पण जर उचकी खूप वेळ थांबत नसेल, वारंवार येत असेल किंवा त्यासोबत वेदना होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.