मुख्यमंत्रिपदासाठी कुठे-कुठे जाऊन भीक मागता? ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Updated On:

शिवसेनेची दोन शकले झाल्यापासून दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे दसरा मेळावा आयोजित करत असून यंदा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने या मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. आझाद मैदानात एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा सुरु असून यामध्ये ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाल्या ज्योती वाघमारे?
स्वाभिमानी शिवसैनिकांना मानाचा मुजरा. शिवसैनिक कोणासमोर वाकत नाही. जो धनुष्यबाण काँग्रेसकडे गहाण ठेवला होता तो स्वाभिमानी मुख्यमंत्री यांनी सोडवून आणला. जे नेहमी बोलतात आमचा बाप चोराला, 2019 निवडणुकीत भगवा असलेला रंग बदलला कसा?

उद्धव ठाकरे मातोश्री नाव बदलून आमिजान ठेवणार आहेत असं कळतय, आम्हाला सांगा कुठे कुठे जाऊन भिक मागता? मला मुख्यमंत्रीपद जाहीर करा असं म्हणता. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री स्वाभिमानाने काम करत आहेत.

आज माविआ मध्ये कौन बनेगा मुख्यमंत्री असा खेळ सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांना कार्टं म्हणता मग तुमच्या मुलाला कार्टून म्हणायचं का? एक कार्टून काय काय करतात, दुसरं कार्टून अंबानी यांच्या लग्नात नाचतो. शिंदे बाळासाहेब याचे विचार पुत्र ठरले आहेत अशी टीका ज्योती वाघमारे यांनी केली आहे.

कोण आहेत ज्योती वाघमारे?
ज्योती वाघमारे या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. आंबेडकरी चळवळीत काम करणारा चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे. ज्योती वाघमारे यांची सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीच्या माध्यमांतून कार्याला सुरूवात झाली. वालचंद कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या. मराठीवर प्रभुत्व असल्याने त्यांनी आपल्या वक्तृत्वातून अनेक मंच गाजवले आहेत.

२०१४ साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केलं. शिवसेना फुटीनंतर वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

2026-10-05 22:33:48

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

2026-10-05 18:22:37

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

Satara News: सातारा जिल्ह्यातील ५ तालुके दुष्काळग्रस्त होणार? ना. शंभूराज देसाईंच्या पाठपुराव्याची दखल

2026-10-01 00:15:30

Satara News: सातारा जिल्ह्यातील ५ तालुके दुष्काळग्रस्त होणार? ना. शंभूराज देसाईंच्या  पाठपुराव्याची दखल

Eknath Shinde : पराभवानंतरच निवडणूक आयोग, ईव्हीएमवर टीका; एकनाथ शिंदे यांचा विरोधकावर निशाणा

2026-09-27 17:06:18

Eknath Shinde : पराभवानंतरच निवडणूक आयोग, ईव्हीएमवर टीका; एकनाथ शिंदे यांचा विरोधकावर निशाणा