इसब त्वचारोगावर असा करा उपचार

डॉ. स्वप्निल सुतार

इसब हा एक सामान्य त्वचारोग आहे. जागतिक पातळीवर विचार केला, तर सुमारे 40 टक्‍के लोकसंख्या ही कमीजास्त प्रमाणात इसबाने पीडित असल्याचे आढळते. इसब बरा करणे हे आयुर्वेदिक आणि ऍलोपॅथिक या दोन्ही पॅथीसमोर हे एक मोठे आव्हान आहे.

पचनास जड व पित्तकर पदार्थांचे सेवन.
2. इसब  या त्वचारोगा मध्ये-  वेगधारण (उलटी होत असेल तर ती थांबवून धरणे इत्यादी)
3. इसब  या त्वचारोगा मध्ये -अतिश्रम (ज्यात अति घाम येतो) अति व्यायाम.
4. इसब  या त्वचारोगा मध्ये -विरुद्ध आहार, अति आहार
5. इसब  या त्वचारोगा मध्ये – अभिष्यंदी पदार्थ (दही, आंबवलेले पदार्थ इत्यादी)
6.इसब  या त्वचारोगा मध्ये-  पंचकर्मानंतर सांगितलेले पथ्य न पाळणे
7. इसब  या त्वचारोगा मध्ये – दिवास्वप्न (दिवसा झोपणे)
तणाव त्याचप्रमाणे कोरडे हवामान, कोरडी त्वचा ही सुद्धा इसबाची तीव्रता आणखी तीव्र करणारी कारणे आहेत.

 

उपचार
यात अनेक प्रकारच्या औषधांचा व मलमांचा वापर केला जातो. लक्षणांनुसार अँटि ऍलर्जिक, कॉर्टिकॉस्टेरॉईड, इम्युनोमॉड्युलेतर इत्यादी अँटिफंगल ट्रीटमेंटचा वापर केला जातो.

त्याच प्रमाणे महत्त्वाचे म्हणजे शारीरिक स्वच्छता, अति तिखट-तेलकट पदार्थ टाळणे, जास्त घाम येणार नाही याची काळजी घेणे घाम आल्यास त्वरित कोरड्या टॉवेलने स्वच्छ पुसून घेणे आदी काळजी घ्यावी लागते.

1. पंचकर्मे-रुग्णाच्या प्रकृतीनुअसर व व्याधीच्या लक्षणांनुसार कोणते पंचकर्म करायचे हे ठरवले जाते. उदा. कफप्रधान लक्षणे असतील तर वमन कर्म, पित्तप्रधान असतील तर विरेचन कर्म, वात दोषांची दुष्टी जास्त असेल तर बस्ती कर्माचा उपयोग होतो.

2.रक्‍तमोक्षण- यामध्ये मुख्यत: रक्‍त मोक्षण करण्यासाठी जलौकाचा वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे सिरावेधनचाही उपयोग होतो. या प्रकारांमध्ये शरीरातील अशुद्ध रक्‍त काढले जाते व नवीन शुद्ध रक्‍त तयार होण्यास चालना मिळते.

3. औषधे- आयुर्वेदीय उपचारांमध्ये रुग्णाच्या व्याधीसोबतच त्त्याची प्रकृती, व्याधीची कारणे, ऋतू आदी गोष्टींचा विचार केला जातो. इसबामध्ये साधारणत: खदिरारीष्ट, आरोग्यवर्धिनी, गंधक रसायन, पित्त शामक चिकित्सा आदींचा वापर केला जातो. मात्र वरील औषधे वैद्याच्या सल्ल्याविना घेऊ नयेत.

4. योग्य व पौष्टिक आहार- यामध्ये मांसाहार, दही, तेलकट पदार्थ टाळावे. पित्तकर पदार्थ, शरीरातील उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळावे. आहारामध्ये तुपाचा भरपूर वापर करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.