पुणे जिल्हा | अॅडमिशन घेताना महाविद्यालयाची इमारत बघू नका

इंदापूर, (प्रतिनिधी) – कोणत्याही महाविद्यालयात अॅडमिशन घेताना विद्यार्थ्यांनी फक्त महाविद्यालयाची इमारत न बघता त्या महाविद्यालयामध्ये शिकवणारा शिक्षक व सुसज्ज ग्रंथालय असणार्या महाविद्यालयामध्येच अॅडमिशन घ्यावे, असे प्रतिपादन तंत्र शिक्षण संचालनालयचे माजी संचालक डॉ. एन. बी पासलकर केले.
तंत्रशिक्षण संचालनालय विभागीय कार्यालय पुणे, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ पुणे व विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, महाविद्यालयात 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. पासलकर बोलत होते.
यावेळी प्रमुख व्याख्याता डी. वाय. पाटील, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुण्याचे माजी प्राचार्य डॉ. विजय वढाई व शासकीय तंत्रनिकेतन, पुणे चे प्राचार्य व अॅडमिशन नोडल ऑफिसर डॉ. आर. के. पाटील आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे व्याख्याता परांजपे, माळेगाव पॉलिटेक्निक कॉलेजचे माजी प्राचार्य वाबळे,
बाबासाहेब पॉलिटेक्निक, कळंब कॉलेजचे प्राचार्य ठोंबर, पाणिव पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुजय देशपांडे यांनी सूत्रसंचालन प्राध्यापिका सोनाली काळे यांनी तर प्राध्यापक सदानंद भुसे यांनी आभार मानले.





