कर्ज हप्ता सवलतीस मुदतवाढ नको
Updated On:

मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने कर्जावरील हप्ता न देण्याची सवलत दिली आहे. या सवलतीस मुदतवाढ देण्याची गरज नाही कारण कर्ज घेतलेल्या बऱ्याच लोकांनी कर्जाचे हप्ते देण्यास सुरुवात केली आहे, असे स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.
स्टेट बॅंकेकडून 16 लाख कोटी रुपयांचे टर्म लोन घेण्यात आले आहे. यातील केवळ 9.5 टक्के लोकांनी कर्जाचा हप्ता न भरण्याच्या सवलतीचा फायदा घेतला. यावरून या योजनेची ग्राहकांना फारशी गरज नसल्याचे दिसून येते. सध्याचा काळ सरकारी आणि खासगी बॅंकांना कर्ज वितरणासाठी सर्वांत योग्य काळ असल्याचे कुमार यांनी वेबिनारमध्ये सांगितले.





