Satara | पुसेसावळीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरु

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – येथील प. पू. कृष्णदेव महाराज विश्वस्त मंडळ यांच्यावतीने श्री कृष्णदेव महाराज व प. पू. गोविंदकाका उपळेकर महाराज पुण्यतिथी निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सोमवार, दि. २३ ते सोमवार, दि. 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
सप्ताहात पहाटे काकड आरती, राम कृष्ण हरी जप,ज्ञानेश्वरी वाचन, भजन, प्रवचन, हरिपाठ, रात्री 9 ते 11 कीर्तन आणि रात्री अकरानंतर जागर असा दिनक्रम आहे.
सप्ताह काळात हभप राहुल महाराज शामगाव, हभप आबासाहेब कदम, हभप नवनाथ महाराज उंचीठाणे, हभप आनंद महाराज येडेकर, हभप सुनिताताई आव्हाड, हभप माऊली महाराज पडघान, हभप अनंत पाठक यांची प्रवचन सेवा होणार आहे.
हभप बबन महाराज हिंगणगाव बुद्रुक (सांगली), हभप अरुण पुंडे राशीन, हभप राधिका आडिवरेकर, हभप भागवताचार्य धनश्रीताई रजपूत, हभप सुरेश महाराज ठोसर, हभप सुनिताताई आव्हाड, हभप माऊली महाराज पडघान, हभप महेश पाटील तसेच, श्रीज्ञानेश्वरी पारायण सांगता व श्रीकृष्णदेव महाराज पुण्यतिथी निमित्त हभप नारायण महाराज आळंदी यांचे कीर्तन होणार आहे.
दि. 24 रोजी प.पू.गोविंदकाका उपळेकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्मृती सुगंध’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा माजी खा. संजयकाका पाटील, राहुल पाटील, अॅड. बाळासाहेब पानस्कर, नाना महाराज केळकर, वैशाली भंडारे, संजय भंडारे, सुरेशबापु पाटील, अभिषेक कराळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सप्ताहच्या शेवटच्या दिवशी दिंडी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण सोहळ्याचा लाभ पुसेसावळीसह पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन कृष्णदेव महाराज विश्वस्त मंडळ यांच्यावतीने करण्यात आले.





