DK Shivakumar । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी निकालाबाबत मोठा दावा केलाय. डीके शिवकुमार यांनी, यंदा I.N.D.I.A ब्लॉकला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, तर NDA ला 200 च्या आसपास जागा मिळतील” असा खळबळजनक दावा केलाय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डीके शिवकुमार यांनी इतरही अनेक दावे केले गेलेत ते म्हणाले की, “भाजप यावेळी भावनिक आणि विकासाचे कार्ड खेळत आहे. 2019 मध्ये भाजपने जनतेला अनेक आश्वासने दिली, मात्र एकही आश्वासन पूर्ण केले नाही. कर्नाटकचा उल्लेख करून त्यांनी, “आम्ही तिथे दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आहोत, तर उत्तर प्रदेशात भाजपने जी काही आश्वासने दिली होती ती अजूनही पूर्ण होताना दिसत नाहीत. दक्षिणेत भाजप दुहेरी आकडा गाठू शकणार नाही या लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या कामगिरीबद्दल डीके शिवकुमार यांना विचारले असता ते म्हणाले की यावेळी एनडीएला सुमारे 200 जागा मिळू शकतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला दुहेरी आकडा गाठता येणार नाही. I.N.D.I.A ब्लॉकबाबत ते म्हणाले की, यावेळी आम्ही 300 पेक्षा जास्त जागा जिंकू. सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे कौतुक DK Shivakumar । डीके शिवकुमार यांनी समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांचेही कौतुक केले. ते म्हणाले की, अखिलेश यादव यांनी खूप चांगले काम केले आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक चांगली विकासकामे केली असून अतिशय स्वच्छ प्रशासन दिले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी सोबत घेतले आहे आणि यापुढेही घेतील. या निवडणुकीनंतरही काँग्रेसची सपासोबतची युती कायम राहणार असल्याचे ते म्हणाले. प्रज्वल रेवन्ना प्रकरणाचा तपास डीके शिवकुमार यांना प्रज्वल रेवन्नाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कर्नाटक सरकारने एक एसआयटी स्थापन केली आहे, जी या प्रकरणाचा तपास करत आहे. भाजपवर प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले की, जनता दल (धर्मनिरपेक्ष) सोबत भागीदारी सुरू ठेवायची की नाही हे भाजपला ठरवावे लागेल. डीके शिवकुमार यांनी या प्रकरणी एचडी कुमारस्वामी यांचा दावाही फेटाळला ज्यात त्यांनी व्हिडिओ लीक करण्यामागे मोठे षड्यंत्र असल्याचे म्हटले होते.