Actress Dia Mirza’s post : दियाकडून ‘रहेना है तेरे दिल में’ चित्रपटातील आठवणींना उजाळा; सुंदर पोस्ट शेअर करत म्हणाली…

Actress Dia Mirza’s post : २००१ मध्ये अभिनेत्री दिया मिर्जा आणि अभिनेता आर माधवन यांचा ‘रहेना है तेरे दिल में’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांना खास करून तरुणांना वेड लावले होते. या चित्रपटातील दिया आणि माधवन यांच्या नव्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हे दोन्ही कलाकार कुठेही मुलाखत आदी कार्यक्रमांसाठी गेले की रहेना है तेरे दिल में चित्रपटाचा उल्लेख होतो. नुकतेच अभिनेत्री दिया मिर्जाने इन्स्टावरून एक पोस्ट शेअर करत या चित्रपटातील आठवणींना उजाळा दिला आहे.
या चित्रपटातील कथा जितकी प्रेक्षकांना आवडली तितकीच चित्रपटातील हृदयस्पर्शी गाणी आजही ऐकली जातात. अभिनेत्री दिया मिर्झाने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दियाने सोशल मीडिया पोस्टमधून या चित्रपटातील एका गाण्याचा उल्लेख केला आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिने स्वतःचा एक सेल्फी शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हसताना दिसत आहे.
View this post on Instagram
या फोटोला दियाने रहना है तेरे दिल में चित्रपटातील गाण्याची धून अॅड केली आहे. तसेच ‘या धूनने माझ्या प्रौढ आयुष्यातील गाणे अनेक प्रकारे परिभाषित केले आहे’. असे कॅप्शनही दिले आहे. दियाने पुढे लिहिले की, ‘मी १९ वर्षांची होते तेव्हा मी मुलांसोबत पावसात नाचत असे. हा पहिला सीन होता ज्याने मला कलाकार म्हणून प्रेक्षकांना ओळख करून दिली.’ चित्रपटात मला स्वीकारल्याबद्दल आणि इतके प्रेम दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे, असेही दियाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा : “आपली मराठी अस्मिता धमकावून नव्हे, तर…”; बॉयफ्रेंड शिखरच्या पोस्टला जान्हवी कपूरचा पाठिंबा





