\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
पद्मालक्ष्मी सध्या पती भांडवल गुंतवणूकदार असलेला तिचा पती अॅडम डेल आणि दोघांची दहा वर्षांची मुलगी कृष्णासोबत राहते.पद्मालक्ष्मी हे व्यक्तिमत्व अनेकांना गूढ वाटते तसेच अनेकांना तिचा हेवा देखील वाटतो. कारण सरळमार्गी अपेक्षांचे ओझे घेऊन जगत राहण्याचा मार्ग तिने नाकारला. मॉडेलिंगपासून, कुकिंग, शेफ ते लेखनापर्यंतच्या अनेक क्षेत्रात ती संचार करत राहिली. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीत सातत्याने संघर्ष करत, कुणाच्याही बोलण्याची पर्वा न करता पुढे जात राहण्याच्या तिच्या वृत्तीमुळे ती आज यशस्वी स्त्री म्हणून वावरते. त्यामुळेच ती अनेकांसाठी रोल मॉडेल असते तर काहीजणांसाठी तिचा हा प्रवास नाके मुरडणारा ठरतो.
\nपद्मा पार्वती लक्ष्मी वैद्यनाथन असे तिचे लांबलचक नाव असले तरी ती पद्मालक्ष्मी या नावाने ओळखली जाते. 1 सप्टेंबर 1070 रोजी तिचा जन्म चेन्नईतील मध्यमवर्गीय तमीळ कुटुंबात झाला. दोन वर्षाची असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. तिची आहे कर्करुग्णांवर उपचार करणारी निवृत्त परिचारिका आहे. ती चार वर्षांची असताना आईने तिला घेऊन स्थलांतरित म्हणून न्यूयॉर्क गाठले. कॅलिफोर्नियात शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्पेनमधील माद्रीद येथे गेल्यावर तिची फॅशन जगताशी ओळख झाली आणि पॅरिसमधून मॉडेलिंगची सुरवात झाली. पॅरिसमधून करिअरला सुरवात करणारी ती पहिली भारतीय वंशाची मॉडेल ठरली. त्याचबरोबर भारतीय वंशाची पहिली आंतरराष्ट्रीय मॉडेल म्हणून ती ओळखली जाते.
\n\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
शाळेत असताना तिला अनेकदा तिच्या रंगावरून वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. सात वर्षांची असताना अमेरिकेतील सावत्र वडिलांच्याकडील नातेवाईकांनी तिच्याबरोबर केलेले अश्लील वर्तन आणि त्याची वाच्यता आईवडिलांकडे केल्यावर त्यांनी तिला एक वर्षांसाठी भारतात आजीआजोबांकडे राहण्याची शिक्षा कशी दिली होती हे तिने 2018 मध्ये न्यूयॉर्क टाईम्समधील एका लेखात लिहिले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी झालेल्या बलात्काराविषयी जाहीरपणे बोलण्याचे धाडस यायला 1986 साल कसे उजाडले हे सांगताना तिने लिहिले होते की, मी हे सगळे आत्ता सांगते आहे कारण, आपण सगळ्यांनी मिळून लढले पाहिजे. जेणेकरून आपल्या मुली भितीने आणि लाजेने दबून जगत राहणार नाहीत आणि मुलग्यांना समजेल की मुलींचे शरीर हे त्यांची भूक भागवण्यासाठी नसते तर अशा गैरकृत्यांचे गंभीर परिणाम त्यांना भोगायला लागू शकतात.
\n\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
बुकर पारितोषिक विजेते लेखक सलमान रश्दी यांनी पद्मालक्ष्मीसाठी त्यांच्या तिसऱ्या पत्नीला सोडले. तीन वर्षे दोघे एकत्र रहात होते. दोघांच्या वयात 23 वर्षांचे अंतर असताना 2004 मध्ये त्यांनी लग्न केले. रश्दी यांनी 2001 मध्ये लिहिलेले फ्युरी नावाची कादंबरी पद्मालक्ष्मीला समर्पित केली आहे. तिने रश्दी यांच्याशी लग्न केले असले तरी तिचे मॉडेलिंगमधील करिअर बहरत होते. त्याचबरोबर लेखक म्हणूनही तिची ओळख निर्माण झाली होती. तिचे इझी एक्झॉटिक नावाचे पहिले पुस्तक त्याचवेळी प्रकाशित झाले. दोघांच्या संबंधात पुढे कटूता निर्माण झाली आणि त्याची परिणीती 2007 मध्ये घटस्फोटात झाली. त्यानंतर ती अॅडम डेलच्या प्रेमात पडली. काही काळ ती उद्योजक टेडी फ्रॉस्टमनसोबत नात्यात होती. फेब्रुवारी 2010 मध्ये तिला डेलपासून मुलगी झाली. मात्र तेव्हाही मुलीच्या ताब्यावरून कोर्टकचेऱ्या आणि वादाला तिला सामोरे जावे लागले. आता 2017 पासून तिघेही एकत्र राहू लागले आहेत.
\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"पद्मालक्ष्मीने शेअर केला दिवाळी लूकमधला फोटो","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/11/padamalakshmi01.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/diwali-hidden-photo-by-padmalakshmi#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/11/padamalakshmi01.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/diwali-hidden-photo-by-padmalakshmi#webpage","name":"पद्मालक्ष्मीने शेअर केला दिवाळी लूकमधला फोटो","url":"https://www.dainikprabhat.com/diwali-hidden-photo-by-padmalakshmi","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/diwali-hidden-photo-by-padmalakshmi#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/11/padamalakshmi01.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/diwali-hidden-photo-by-padmalakshmi#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/diwali-hidden-photo-by-padmalakshmi","name":"पद्मालक्ष्मीने शेअर केला दिवाळी लूकमधला फोटो"}}]}}}