दिवाळी सणाला महावितरणाचा झटका

चांदा – हिंदू धर्मा मध्ये दिपावलीच्या सनाला खूप महत्त्व आहे आणि याच महत्वाच्या सनाला विज वितरण कंपनी ग्राहकांना पहाटे विज बंद करून विजेचा झटका देत आहे त्यामुळे ग्राहकांना समजेना नेमक चाललय तरी काय ?
दिपावलीचा सनाचा उत्सव सूरु होऊन तीन दिवस झाले गावात व परिसरातील कातीॅक स्नानाच्या निमित्ताने मंदिरात काकडा भजन मोठ्या उत्साहात चालू झाले आहे.
अनेक भाविक या धार्मिक काकडा भजनाला आनंदाने उपस्थित राहतात पण विज वितरणाचा विद्युत पुरवठा मात्र पहाटे साडेपाचला च बंद होतो त्या मुळे अनेक भाविक विज वितरण कंपनी विषयी तीव्र संताप व्यक्त करतात एक महिनाभर आम्हाला विज नका देऊ पण दिपावलीच्या अगोदर चार दिवस व दिपावली नंतर चार दिवस अशी किमान आठ दिवस तरी विज वितरण कंपनीने विज पुरवठा खंडित न करता सुरळीत ठेवावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नेमकी सनासूदीच्या काळात विज बंद ठेवतात त्या मुळे आम्हाला च कळेना विज वितरणाच कंपनीच नेमक चाललय तरी काय अनेक घरावर मनमोहक सजवलेले आकाश कंदील असतात तर आकर्षक लाईटच्या माळी घराच्या भिंतीवर टाकून घर सजवले जाते त्या मुळे घरावर लख प्रकाश होऊन घर व परिसर कसे आनंदी होते आणि या आनंदात विज वितरण कंपनीने किमान आठ दिवस सहभागी व्हावे व विज पूरवठा खंडित करु नये अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे .





