दिवाळी कॅन्सल, लग्नही रद्द… आईंच्या डोळ्यात अश्रू, H-1B Visa शुल्काने भारतीयांच्या प्लॅनवर फिरवलं पाणी

H-1B Visa news: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाचे शुल्क १,००,००० डॉलर (सुमारे ८८ लाख रुपये) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारतीयांमध्ये घबराट आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की, हे नवे शुल्क फक्त २१ सप्टेंबरनंतर नोंदणी करणाऱ्या नवीन अर्जदारांनाच लागू होईल. तरीही, या अनिश्चिततेमुळे अनेक भारतीयांना आपले कौटुंबिक कार्यक्रम, दीर्घकाळापासून नियोजित प्रवास आणि अगदी लग्नसोहळे रद्द करावे लागले आहेत. यामुळे अनेकांच्या माता आपल्या मुलांना भेटण्याच्या आनंदापासून वंचित राहिल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहे.
अमेरिकन कंपन्यांच्या निर्णयाने गोंधळ –
ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर काही मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या परदेशी कर्मचाऱ्यांना २४ तासांत परतण्याचे आदेश दिले. यामुळे अनेक भारतीयांना विमानतळाकडे धाव घ्यावी लागली. परिणामी, त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमांना आणि नियोजित प्रवासांना खीळ बसली. अमेरिकन सरकारच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एच-१बी व्हिसा मिळवणाऱ्यांमध्ये भारत अव्वल होता, जिथे ७१ टक्के अर्ज मंजूर झाले. मात्र, या नव्या शुल्कवाढीमुळे भारतीयांचे अमेरिकेतील स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
Between 1:40 and the end of the video, Howard Lutnick twice said that the H1B visa fee would be $100,000 PER YEAR.
Now they’ve clarified that this is a one time fee for new H1B applicants only.
This isn’t miscommunication. Trump chickened out yet again.pic.twitter.com/xyWjhRF5F2
— Zucker Doctor (@DoctorLFC) September 21, 2025
नवीन नियमाची व्याप्ती –
व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की, १,००,००० डॉलरचे शुल्क फक्त नवीन अर्जदारांना लागू होईल. सध्या अमेरिकेत राहणारे एच-१बी व्हिसाधारक यातून सूट मिळतील आणि त्यांना व्हिसा नूतनीकरण किंवा पुन्हा प्रवेशासाठी हे शुल्क द्यावे लागणार नाही. तरीही, या अनिश्चिततेमुळे अनेकांनी आपली नियोजित योजना रद्द केली.
सोशल मीडियावर संताप –
सोशल मीडियावर या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रेडिट वापरकर्ता ‘सरमुच’ याने आपली आणि इतर एच-१बी व्हिसाधारकांची व्यथा मांडली. त्याने लिहिले, “अमेझाॅन, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना २१ सप्टेंबरपूर्वी परतण्याचे ईमेल पाठवले. माझी आई खुप रडली” अनेकांनी आपली लग्न रद्द केली, तर काहींना दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ पूजेसाठी भारतात येण्याच्या योजना रद्द कराव्या लागल्या.
उत्सवांवर पाणी –
हा निर्णय दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ पूजेच्या अगदी आधी आला आहे, ज्या काळात भारतीय जगभरात उत्साहाने सण साजरे करतात. या काळात अनेक तंत्रज्ञान व्यावसायिक आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी भारतात येतात. मात्र, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “लोकांनी दिवाळीसाठी भारतात येण्याचे नियोजन केले होते. आता सर्वजण संभ्रमात आहेत. कुटुंबांनी बराच आधीच तिकिटे बुक केली होती, पण आता त्यांना काय करावे हे समजत नाही.”
भारतीयांचे भवितव्य काय?
एच-१बी व्हिसाच्या शुल्कवाढीमुळे भारतीय तंत्रज्ञान व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेतील ग्रीन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया आधीच कठीण होती, आणि आता या नव्या नियमांमुळे भारतीयांचे अमेरिकन स्वप्न अधिकच कठीण होणार आहे.





