Diwali 2025 : दिवाळी म्हणजे आनंद, भेटवस्तू आणि गोडवा यांचा सण! पण यंदा जर तुम्ही मिठाई आणि शोपीसऐवजी आरोग्यदायी भेटवस्तू दिल्या, तर तुमची दिवाळी आणखी खास होऊ शकते. कारण अशी भेट जी मनालाही भावेल आणि खिशावरही हलकी पडेल, तीच खरी संस्मरणीय ठरते. म्हणूनच जाणून घ्या काही हेल्दी आणि बजेट-फ्रेंडली दिवाळी गिफ्ट आयडियाज…. 1. सुकेमेवे आणि बियांचा पौष्टिक खजिना बदाम, काजू, मनुका, चिया आणि फ्लॅक्स सीड्स अशा मिक्स नट्सचा एक सुंदर पॅक तयार करा. हे तुम्ही काचेच्या छोट्या जारमध्ये किंवा कापडी पोटलीत भरून आकर्षक रिबनने सजवू शकता. ही भेट दिसायलाही सुंदर आणि आरोग्यासाठीही फायदेशीर! 2. घरच्या घरी बनवलेला हर्बल टी पॅक थंडीच्या दिवसात गरमागरम हर्बल टी म्हणजे आरोग्याचा अमृतकुंभ! तुळस, आलं, बडीशेप आणि वेलदोडा यांचा सुगंधी चहा पावडर तयार करून सुंदर जारमध्ये भरा. ही भेट शरीर आणि मन दोन्ही शांत करणारी ठरेल. 3. ऑर्गॅनिक मधाचा छोटा जार १०० मिलीचा प्यारा ऑर्गॅनिक हनी जार ही गोड भेट रिफाइंड साखरेचा आरोग्यदायी पर्याय आहे. ही भेट लहान, बजेटमध्ये आणि गोडवा भरलेली आरोग्याचाही आणि नात्याचाही! 4. नैसर्गिक आणि हर्बल उत्पादने नीम, अलोवेरा, हळद इत्यादी घटकांपासून बनवलेले हँडमेड साबण द्या. सुंदर, उपयुक्त आणि स्किन-फ्रेंडली! तसेच तुळस, मनी प्लँट किंवा अलोवेरा यांसारखे छोटे हिरवे रोप गिफ्ट करा. ही झाडं हवा शुद्ध करतात आणि घरात सकारात्मकता आणतात. 5. गुलाबी हिमालयन सॉल्ट छोट्या काचेच्या जारमध्ये भरलेले हिमालयन पिंक सॉल्ट हे आरोग्यदायी आणि आकर्षक गिफ्ट आहे. हे मीठ ब्लड प्रेशर आणि थायरॉईडसाठी फायदेशीर मानले जाते. 6. मेडिटेशन जार / मनशांतीची भेट घरच्या घरी बनवलेला मेडिटेशन जार द्या. त्यात रंगीबेरंगी कागदांवर सकारात्मक विचार आणि अॅफर्मेशन्स लिहा. प्रत्येक चिठ्ठी मनाला शांती आणि प्रेरणा देईल. तसेच स्टील किंवा कॉपरचे छोटे ग्लास सेट. टिकाऊ, आकर्षक आणि इको-फ्रेंडली पर्याय आहेत. 7. हेल्दी कँडी – गोड पण पौष्टिक आवळा कँडी किंवा मुरंबा ही गोड भेट व्हिटॅमिन C ने भरलेली आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही भेट! 8. ताज्या फळांची आकर्षक टोपली केळी, सफरचंद, संत्री आणि मोसंबीने सजवलेली एक सुंदर फळांची टोपली द्या. ही भेट सर्व वयोगटांसाठी उपयुक्त, हेल्दी आणि ताजेपणाने भरलेली असते. ही टोपली तुम्ही ज्यूट बॅग किंवा पेपर बास्केटमध्ये सादर करा आणि त्यासोबत एक हस्तलिखित शुभेच्छा कार्ड जोडा.