Mouni Roy : छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध मिळवलेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चित आली आहे. तिचा पती सूरज नंबियारसोबत घटस्फोट घेतल्याची चर्चा मनोरंजन विश्वात सुरू आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. ही चर्चा होण्यामागेचे कारण म्हणजे दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले. त्यानंतर मौनीने सूरजसोबतचे तिच्या लग्नाचे फोटोदेखील डिलीट केले आहेत. नंतर सूरजनेही त्याचे अकाउंट डिलीट केले. मात्र, घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, मौनीने या चर्चांदरम्यान सोशल मीडियावर तिची पहिली पोस्ट शेअर केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. घटस्फोटाच्या अफवांदरम्यान मौनी रॉयची पहिली पोस्ट (Mouni Roy) मौनी रॅायने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने घटस्फोटाच्या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, तिने तिच्या बहिणीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मौनीने रूपाली कादियानसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जिला तिने तिची बहीण म्हटले आहे. मात्र, यापैकी कोणत्याही फोटोमध्ये सूरज दिसत नाही. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मौनीने लिहिले, “माझी बहीण, आनंदी असो वा दुःखी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझं सर्वस्व. मला तुझे विनोद, तुझी विनोदबुद्धी, तुझं आंतरिक सौंदर्य आणि तुला तू बनवणारी प्रत्येक गोष्ट आवडते! माझं तुझ्यावर प्रेम आहे! माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे शब्दांत सांगता येणार नाही, आणि हे तुला माहीत आहे. तसं, तू एक जादूगार आहेस.” दरम्यान, काल मंगळवार सकाळपासूनच मौनी आणि सूरजच्या विभक्त होण्याच्या बातम्या समोर येत आहेत. जेव्हा चाहत्यांच्या लक्षात आले की त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. तेव्हापासून या चर्चांना अधिक उधाण आले आहे. Actress Mouni Roy मौनी आणि सूरजचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले होते. (Mouni Roy) हे लक्षात घेण्यासारखे आहे की चार वर्षांपूर्वी २०२२ मध्ये मौनी आणि सूरजने गोव्यात मोठ्या थाटात लग्न केले होते. त्यांनी मल्याळी आणि बंगाली दोन्ही परंपरेनुसार लग्न केले. आगामी काही दिवसांमध्ये अभिनेत्री मौनी रॉय नवीन चित्रपटात झळकणार आहे. मधुर भांडारकर यांच्या ‘द वाइव्ह्स’ या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, रेजिना कॅसांड्रा, राहुल भट्ट, सौरभ सचदेवा, अर्जन बाजवा आणि फ्रेडी दारूवाला या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. याव्यतिरिक्त, डेव्हिड धवन यांच्या ‘है जवानी तो इश्क होना है’ या रोमँटिक चित्रपटाच देखील मौनी रॅाय दिसणार आहे. वरुण धवन, पूजा हेगडे, कुब्रा सैत, मनीष पॉल, रोहित सराफ, राजीव खंडेलवाल, नितीश निर्मल आणि श्रीलीला या कलाकारांच्या देखील भूमिका आहेत. हेही वाचा : गुजरातची अव्वल स्थानी झेप, हैदराबादला मोठा धक्का; जाणून घ्या कोणाला आहे प्लेऑफची संधी आणि काय आहे समीकरण!