प्रभाग पुर्नरचना | प्रभाग 15 मध्ये नागरिकांच्या हरकतींचा पाऊस

पुणे(प्रतिनिधी) – महापालिका निवडणूकांच्या अनुषंगाने नुकत्याच प्रभाग रचना जाहीर झाल्या आहेत. त्यावर हरकती दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवारी (दि. 14) संपली. शेवटच्या दिवशी प्रभाक क्रमांक 15 (पंचवटी गोखलेनगर) तब्बल 316 हरकतीची नोंद झाली आहे.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण पडू नये म्हणून भौगोलिक दृष्ट्या सोयीस्कर असताना देखील गुंजाळवाडी या वस्तीची विभाजन करून हा भाग प्रभाग क्रमांक 16 जोडण्यात आला. असे आरोप सर्वपक्षीय स्थानिक कार्यकर्त्यांनी करून या हरकती नोंदविल्या आहेत.
हनुमान टेकडी ओलांडून अल्पसंख्यक गुंजाळवाडी या भागाचा काही भाग दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आला, तर चतु:श्रृंगी डोंगरात पलीकडचा भागातील चार याद्या प्रभाग 15 मध्ये जोडण्यात आले आहेत. हे सर्व राजकीय दबाव व हस्तक्षेप यामुळे झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे.
पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त रवी कंधारे यांच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग 15 च्या संदर्भात 316 हरकतीचा नोंद झाल्याचे कमलाकर माने यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते बाळा चव्हाण, सचिन इंगळे, राजेश्री अडसूळ, राजेश नायडू, रमेश भंडारी,संजय तुरेकर, अजित इंगळे,रुपेश सोनवणे, भूषण भवर,राजेश काकडे, विशाल गायकवाड आदींसह अनेक नागरिक हरकती नोंदण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात गर्दी केली होती.





