“पाकिस्तानचे दोन तुकडे करा आणि पीओके भारतात विलीन करा”; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Revanth Reddy | तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, ‘पहलगामसारख्या घटना रोखायच्या असतील, तर केंद्र सरकारकडून निर्णायक कारवाई होणे गरजेचे आहे. आता पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे. मी पंतप्रधान मोदींना पीओके भारतात विलीन करण्याचे आवाहन करतो. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तानने आपल्या देशावर हल्ला केला तेव्हा इंदिरा गांधींनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले आणि देशाचे दोन तुकडे केले. आजही आपल्याला पाकिस्तानविरुद्ध अशीच कारवाई करावी लागत आहे. Revanth Reddy |
‘ही तडजोड करण्याची वेळ नाही, योग्य उत्तर दिले पाहिजे’
यावेळी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी आठवण करून दिली की माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1971 मध्ये बांगलादेशच्या निर्मितीबद्दल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची तुलना देवी दुर्गाशी केली होती. रेवंत रेड्डी म्हणाले, “तुम्ही (पंतप्रधान मोदी) दुर्गा मातेचे स्मरण करावे आणि कारवाई करावी. मग तो पाकिस्तानवरील हल्ला असो किंवा इतर कोणताही उपाय असो. आज पाकिस्तानविरुद्ध पावले उचलली पाहिजेत. ही तडजोड करण्याची वेळ नाही. योग्य उत्तर दिले पाहिजे. सरकारने पुढे जावे, आम्ही आणि 140 कोटी भारतीय तुमच्यासोबत आहोत.” Revanth Reddy |
दरम्यान, हैदराबादमध्ये काढण्यात आलेल्या या कॅण्डल मार्चमध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि इतर सर्वच पक्षांचे नेते आणि लोक सहभागी झाले होते. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ असदुद्दीन औवेसी यांनी देशातील मुस्लिमांना नमाज अदा करण्यासाठी जाताना दंडावर काळी पट्टी बांधण्याचे आव्हान केले होते. औवेसींनीही दंडावर काळी पट्टी बांधून नमाज पठण केले. Revanth Reddy |
हेही वाचा:





