रुबीकॉन फाउंडेशन यांच्या वतीने गरीबांना एक हजार किटचे वाटप
वाघोली – हवेली तालुक्यातील वाघोली येथे रुबीकॉन फाउंडेशन यांच्या वतीने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांच्या सहकार्याने गरीबांना अन्नधान्याच्या एक हजार किट चे वाटप करण्यात आले.कोरोना रोगामुळे सर्व सामन्य नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले असून या ब्रेक द चैन मुळे सर्व कामे व्यवसाय बंद असल्याने हातावरचे पोट असलेल्या नागरिकाचे हाल होऊ नये यासाठी रुबीकॉन फाउंडेशन यांच्या वतीने गरीबांना एक हजार किटचे वाटप करण्यात आले.
किट चे वाटप झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर वाघोलीतील वाघेश्वर नगर,सुयोग नगर,ग्रामपंचायत कर्मचारी,यांच्या सह गरजू लोकांना जीवन आवश्यक घरगुती दैनंदिन लागणाऱ्या साहित्याचे एक महिना पुरेल असे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे,माजी उपसरपंच समीर भाडळे,उपसरपंच महेंद्र भाडळे,सुधीर भाडळे,दत्ता कटके,रुबीकॉन फाउंडेशन च्या ट्रस्टी धनिया नारायणन, सेंड्रा मोला,सचिन साहेब,प्रवीण मेमोने,विनायक दाभाडे,पंडित डोंगरे,अंबादास साळुंके,पंडित मुरकुटे,भीमा क्रांती व इतर मान्यवर उपस्थित होते.
गोरगरिबाना मदतीचा ओघ सुरू…
मागील वर्षी देखील वाघोली मधील कामगारांसाठी मोफत अन्नदान उपक्रम ग्रामस्थांनी राबविला होता. त्यावेळी नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. याशिवाय माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी जवळपास १५ लाख रुपयांचा भाजी पाला खरेदी करून नागरिकांना त्याचे मोफत वाटप केले होते. हजारो नागरिकांना मोफत अन्नधान्य किटचे वाटप रामभाऊ दाभाडे मित्र परिवार व ग्रामस्थांनी केले होते. या वर्षी देखील हा उपक्रम सुरूच आहे.
रुबीकॉन फाउंडेशन या संस्थेने गरीबांना एक हजार किटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.असा मदतीचा ओघ गोरगरीबांना मिळणे काळाची गरज बनली आहे. यापुढील काळात अशीच मदत मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
राजेंद्र सातव पाटील
माजी उपसरपंच, वाघोली.





