आमदार लंके यांच्या हस्ते हंगा येथे ग्रामस्थांना औषधांचे वाटप 

करोनावर मात करण्यासाठी पारनेर तालुक्‍यातील इतर गवातही राबविणार उपक्रम 

नगर  -पारनेर तालुक्‍यातील हंगा येथील ग्रामस्थांना आमदार निलेश लंके यांच्या हस्ते होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले. होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रमोद लंके यांनी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार ग्रामस्थांसाठी आर्सेनिकचे औषधे मोफत उपलब्ध करुन रोग प्रतिकारशक्ती वाढविणे, करोनाच्या बचावासाठी उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी आमदार निलेश लंके यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन पारनेर तालुक्‍यातील इतर गावामध्ये देखील या आर्सेनिक औषधाचे वाटप करण्याचे मनोदय व्यक्त केला. यावेळी रामदास साठे, विलास सूर्यवंशी, राजेंद्र शिंदे, अनिल सूर्यवंशी, तुकाराम नवले, मनोहर दळवी, दीपक लंके, बाळासाहेब लंके, यशोदा लंके, शिवाजी लंके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.