satara | देऊर ग्राम विकास समितीकडून ग्रामस्थांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप

महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण वनपरिक्षेत्रामध्ये असणाऱ्या कोअर भागातील पुनर्वसनातील परिस्थितीकीय विकास समिती देऊर यांच्याकडून ग्रामस्थांना सार्वजनिक वापरासाठी टेबल खुर्च्या सतरंजी तसेच वन्य प्राणी पाळीव प्राण्यांचा प्लास्टिकपासून बचाव व्हावा यासाठी डस्टबीन देण्यात आले. ग्रामस्थांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य भाडे तत्त्वावर आणावे लागते.
यामुळे वेळ तसेच अधिक पैसा खर्च करावा लागतो. तसेच गावामध्ये होणाऱ्या प्लास्टिक तसेच इतर कचऱ्यापासून पाळीव प्राणी तसेच वन्य प्राण्यांना धोका होऊ शकतो. गावामध्ये स्वच्छ्ता राहावी त्यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले .
यावेळी वनक्षेत्रपाल वन्यजीव पाटण शिशुपाल पवार यांनी देऊर ग्रामस्थांना जंगलाचे महत्त्व तसेच देऊर समितीमार्फत पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गावांना आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मनीकंदा रामानुजम, उपसंचालक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामे हाती घेतली आहेत.
कार्यक्रमास विकास समिती वेळेचे अध्यक्ष ठकुजी कोकरे, देऊरचे अध्यक्ष मंगेश माने, पोलीस पाटील बाळकृष्ण आखाडे, ग्रामस्थ उपस्थित होते. वनपाल मारुती करपे, वनरक्षक दीपक सोरट, अनिल कुंभार, कैलास पांडे, जाकीर देसाई, बालाजी निकम तसेच वेळे परिमंडळातील सर्व वनमजुरांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.




