वाघोली (प्रतिनिधी) : करोना महारोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे जिल्हा भाजपच्या वतीने आरोग्यदायक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, गृह शाखेचे तहसीलदार ढोणे साहेब, नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरोग्यदायक साहित्यामध्ये एन 95 मास्क ५००, सॅनिटायझर ५०० लिटर, हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर स्टँड १२, सोडियम हॅपोक्लोराईड १२०० लिटर, थर्मल गन १५ अशा विविध प्रकारच्या वस्तू आज वितरित करण्यात आल्या. सामाजिक भावनेच्या हेतूने पुणे जिल्हा भाजप, शिरूर तालुका भाजपा आणि युवा मोर्चा यांनी जवळपास तीन लाख रुपयांचे साहित्य प्रदान केले आहे.
यावेळी पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष गणेश कुटे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सचिव प्रदीपजी गावडे, नुतन शिरूर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहितजी खैरे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश दरेकर आदी उपस्थित होते.