वाघोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन कालावधीत सलूनची दुकाने बंद असल्यामुळे नाभिक समाजाच्या कुटुंबांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. एक हात मदतीचा म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी शंभराहून अधिक नाभिक बांधवांना किराणाकिटचे वाटप केले आहे.
वाढता कोरोनाचा प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सलूनची दुकाने बंद आहेत. त्यामुळे नाभिक समाजाच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. वाघोली येथील माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी एक हात मदतीचा पुढे करून शंभरहून अधिक नाभिक बांधवांना किराणा किटचे वाटप केले आहे. नाभिक बांधवाना केलेल्या मदतीबद्दल सलून व पार्लर असोसिएशनचे पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी रायकर यांनी रामभाऊ दाभाडे यांचे आभार मानले.
यावेळी वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच समीर भाडळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता कटके, माजी उपसरपंच कैलास सातव, राजेंद्र पायगुडे, सागर गोरे, महेंद्र भाडळे, तेजस्विनी संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार, बंटी उर्फ भूषण सोनवने, हरिभाऊ पाचारणे, विशाल पवार, विशाल हरगुडे, दीपक बढे, अर्जुन रायकर, गोकुळ सोनवने आदि उपस्थित होते.