Pune District : नळवणेत ठिबक, तुषार संच वाटप
Pune District : या उपक्रमासाठी लुपिन फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संदीप झणझणे, तालुका समन्वयक प्रताप मोठे, कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब बोराडे व मच्छिंद्र खरात यांचे सहकार्य लाभले.

बेल्हे : जलसंवर्धनातून शेती समृद्ध करण्याच्या उद्देशाने लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून नळवणे (ता. जुन्नर) येथील 33 शेतकर्यांना ठिबक व तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले. पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
नळवणे गावात मोरशेत व पळसठिका पाझर तलावांच्या माध्यमातून जलसाठा वाढविण्यासाठी विविध कामे करण्यात आली आहेत. या पाण्याचा शेतीसाठी योग्य वापर व्हावा, यासाठी शेतकर्यांना आधुनिक सिंचन साधने उपलब्ध करून देण्यात आली. ठिबक व तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होण्यासोबतच पिकांना गरजेनुसार पाणी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून शेती अधिक फायदेशीर करण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी लुपिन फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संदीप झणझणे, तालुका समन्वयक प्रताप मोठे, कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब बोराडे व मच्छिंद्र खरात यांचे सहकार्य लाभले. जलसंवर्धन, लोकसहभाग आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची सांगड घालून नळवणे गावाने शाश्वत शेतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.





