पुणे – वाढदिवस म्हटलं की पार्टी व जल्लोष असे समीकरण हल्ली दृढ झाले असताना आपल्या मुलीच्या पहिल्याच वाढ दिवशी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके व क्रिडा साहित्य वाटून एक आगळा पायंडा पोलीस कर्मचारी किरण साबळे यांनी पाडला. त्यांनी आपली चिमुकली परी गाथा हिच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके व क्रिडा साहित्याचे वाटप केले.
सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी किरण साबळे यांनी आपली मुलगी परी गाथा किरण साबळे हिचा पहिला वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कौठाळी या ठिकाणी सर्व शिक्षक वविद्यार्थ्यांसमवेत साजरा केला. यावेळी परि गाथा हिच्या हस्ते मुलांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित 300 पुस्तके आणि स्पोर्ट्स किट्सचे वाटप करण्यात आले.