राष्ट्रवादीकडून मणिपूरमध्ये मदतीचे वाटप

पुणे – पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मणिपूर मधील आपत्तीग्रस्त नागरिकांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच पक्षाकडून संकलीत करण्यात आलेली मदत मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया ऊईके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी आपत्तीग्रस्त नागरिकांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्षाकडून पुण्यात आल्यावर मदतकक्ष सुरू करण्यात आला होता.
या मदतकक्षाच्या माध्यमातून विविध जीवनावश्यक वस्तू ,सुमारे एक टेम्पो धान्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेऊन पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे धीरज शर्मा यांनी राज्यपाल अनुसुया ऊईके यांची भेट घेत ही मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी “छावणीमधील नागरिकांना लवकरात लवकर त्यांची घरे बांधून देण्यात यावी व त्यांना राहण्यायोग्य सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात यावे, मुलांच्या शाळा लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या तसेच मुलांच्या शाळांची संपूर्ण फी सरकारने भरावी”,अश्या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. प्रशांत जगताप, धीरज शर्मा यांच्यासह इबोयमा सोहराम, किशोर कांबळे, जावेद इनामदार, तालिब मदारी, रुपेश गायकवाड, रमीज सय्यद तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.





