satara | महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे जवळे येथे शेती अवजारांचे वाटप
Updated On:

खंडाळा, (प्रतिनिधी) : खंडाळा तालुक्यातील जवळे येथे अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्पाच्या अनुसूचित जाती या योजनेअंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यातर्फे 25 शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे व साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील उद्यानविद्या विभागाचे प्रा. डॉ. उदय शिंदे व महाराष्ट्र शासन कृषी विभागातील जवळे गावासाठी नियुक्त कर्मचारी जय भोसले यांच्याद्वारे प्रत्येक लाभार्थ्यांना एका वस्तूचे वाटप करण्यात आले.
यामध्ये सायकल कोळपे, नारळ सोलणी यंत्र, भुईमूग शेंगा फोडणी यंत्र व विद्यापीठाची कृषीदर्शनी इत्यादी साहित्याचे वाटप निशुल्क करण्यात आले. अरुण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी गायकवाड यांनी आभार मानले.





