विकास कामांना निधी वितरित करा – विधानसभा अध्यक्ष
Updated On:

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील साकोली आणि लाखांदूर तालुक्यातील विविध विकास कामांना निधी वितरित करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना प पटोले यांनी घेतली बैठक.
भंडारा जिल्ह्यातील रस्ते, पुलांची कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक, प्रधानमंत्री ग्रामसडक, दलित वस्ती सुधारणा आदी योजनेतील २०१९-२० च्या कामांना निधी देण्यासह पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले.
या बैठकीस ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, नगर विकास, अल्पसंख्याक आदी विभागांचे सचिव उपस्थित होते.





