सातारा | जि. प. शाळेची नूतन इमारत शिरवळच्या वैभवात भर घालेल

खंडाळा, (प्रतिनिधी) – दुधगावकर यांच्या प्रयत्नातून आणि टी. ई. कनेक्टिव्हिटी (टायको इलेक्ट्रॉनिक्स) या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) शिरवळ, ता. खंडाळा येथील इंदिरानगरात (सटवाई कॉलनी) एक कोटी 27 लाख रुपये खर्चून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची नूतन इमारत उभारण्यात येणार आहे.
या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी कबुले बोलत होते. टी. ई. कनेक्टिव्हिटी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एस. विश्वनाथ, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र तांबे, गुरुदेव बरदाडे, कंपनीचे संचालक अनिल राय, व्यवस्थापक अजय सिंग, अर्चना वास्तव, संजय होण, शिवाजी कुपते, सरपंच रविराज दुधगावकर, उपसरपंच ताहेर काझी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती बरदाडे, सारिका माने, अर्चना श्रीवास्तव, माजी सरपंच छाया जाधव, पूजा मगर, रूपाली गिरे, दीपाली बोडरे, हेमा गायकवाड, सोनाली देशमुख, सुरेखा हाडके, राहुल तांबे, अमोल कबुले, रोहित जाधव, दिलीप गुंजवटे, विकास तांबे, अंजिक्य कांबळे, समीर काझी, ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे उपस्थित होते.
एस. विश्वनाथ म्हणाले, आधुनिक युगामध्ये स्पर्धेत टिकणारा विद्यार्थी घडवण्याचे कर्तव्य प्रत्येकाचे आहे. या उदात्त हेतूने शिरवळ येथील टी.ई. कनेक्टिव्हिटी कंपनी कार्यरत आहे. दुधगावकर आणि शिरवळकरांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नावलौकिक मिळवेल. राजेंद्र तांबे, संजय होण, शिवाजी कुपते, मुख्याध्यापिका कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. एस. विश्वनाथ यांच्या हस्ते नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. प्रा. पोपट कासुर्डे यांनी सूत्रसंचालन केले.
सरपंचांचा सहा महिन्यांपासून पाठपुरावा
इंदिरानगर (सटवाई कॉलनी) येथील शाळेत वंचित घटकांमधील मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरपंच रविराज दुधगावकर यांनी पाठपुरावा करून, कंपनीच्या सीएसआर फंडातून तब्बल एक कोटी 27 लाख रुपयांचा निधी खेचून आणला.





