वाद पेटणार ! हिजाब घातलेल्या 58 विद्यार्थिनी निलंबित

बेंगळूरू – कर्नाटकातील विविध महाविद्यालयांमध्ये शनिवारी हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. धार्मिक वेशभुषेची सक्ती केली जाऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले गेले असतानाही या विद्यार्थिनींनी हिजाब घालूनच महाविद्यालयात येण्याचा आग्रह कायम धरल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
शिवमोग्गा जिल्ह्यात हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या आणि विद्यापीठांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासनाविरोधात आंदोलन करणाऱ्या 58 विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले.
या विद्यार्थिनूंना शुक्रवारीच निलंबित करण्यात आले आणि शनिवारी कॉलेजमध्ये न येण्याची सूचना त्यांना देण्यात आली होती. मात्र या विद्यार्थिनी शनिवारीही महाविद्यालयात आल्या आणि त्यांनी हिजाब परिदान करणे हा आपला अधिकार असल्याची घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे त्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.





