अकोला: रिक्षा-दुचाकीच्या धडकेनंतर दोन गट आमनेसामने; दगडफेक, जाळपोळ…. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
Updated On:

अकोला – अकोला शहरातील हरिहर पेठमध्ये रिक्षा आणि बाईकची धडक झाली. या धडकेमुळे किरकोळ वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसन मोठ्या भांडणात झाले. दोन गट आमनेसामने आले, दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. यात 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच एक रिक्षा आणि तीन दुचाकी जाळण्यात आल्या आहेत.
या राड्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न संबंधित परिसरात निर्माण झाला होता. पोलिसांचा मोठा फौजफाटा संबंधित परिसरात तैनात आहे. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. दरम्यान, घटना घडली तेव्हा एक पत्रकार कव्हरेज करण्यासाठी आला तेव्हा त्याची देखील दुचाकी जाळून टाकण्यात आली. या घटनेनंतर सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
टॅग्स:





