दिशा पटानीच्या रंगल्या डेटींगच्या चर्चा; ‘या’ पंजाबी गायकासोबतचा व्हिडिओ व्हायरल

Disha Patani | अभिनेत्री दिशा पटानीचे अभिनेता टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तिच्या डेटींगच्या सुरू झाल्या आहेत. दिशा ही पंजाबी गायक तलविंदरला डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उदयपूरमध्ये अभिनेत्री क्रिती सनॉनची बहीण नुपूर सनॉन आणि गायक स्टेबिनचा भव्य विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला दिशा पाटनीही पोहोचली होती. नुपूरच्या लग्नावरुन परत येताना ती विमानतळावर गायक तलविंदरसोबत दिसली. दोघं एकत्रच विमानतळावर पोहोचले. पापाराझी त्यांना कॅमेऱ्यात कैद करु नये म्हणून मुंबईत आल्यानंतर तलविंदर दिशाच्या पुढे गेला. त्यांच्यासोबत मौनी रॉयही होती. Disha Patani |
View this post on Instagram
याच व्हिडीओवरुन सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. याशिवाय त्यांचा नुपूरच्या लग्नातला एक व्हिडीओही रेडिटवर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघं एकमेकांसोबत हसताना दिसत आहेत. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. Disha Patani |
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दिशा शेवटची शिवा दिग्दर्शित तमिळ भाषेतील एपिक फॅंटसी अॅक्शन चित्रपट ‘कंगुवा’मध्ये दिसली होती. लवकरच ती ‘वेलकम टू द जंगल’,’ओ रोमिओ’ या सिनेमांमध्ये दिसणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या ‘तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी’ सिनेमातील ‘तेनु जादा मोहोब्बत’ गाणं तलविंदरचं आहे. Disha Patani |
हेही वाचा:





