दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा एकत्र ? ‘या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांच्या रिलेशनशिपची यापूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती. अनेकांना त्यांची जोडी पसंत पडली होती. मात्र सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी वेगळ होण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. परंतु या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे दोघे पुन्हा एकत्र आल्याची चर्चा रंगली आहे.
व्हायरल व्हिडिओ एका कार्यक्रमाचा असून दिशा पटनी, टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णाही यात दिसत आहे. ते दिल्लीतील एमएफएन इव्हेंटदरम्यान एकत्र स्पॉट झाल्याचे म्हंटले जात आहे. टायगरने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता तर दिशा पांढर्या बॅगी पँटसह निळ्या रंगाच्या फुल-स्लीव्ह क्रॉप टॉपमध्ये दिसून आली. याशिवाय त्यांनी विमानात एकत्र प्रवासही केल्याचे म्हंटले जात आहे. हे पाहून दोघांचे चाहते आनंदी झाले आहेत. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
https://www.instagram.com/reel/CuKNNk5RAmV/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
गेल्या वर्षी त्यांच्या ब्रेकअपचे वृत्त समोर आले होते. मात्र, त्यांच्या ब्रेकअप मागच्या कारणांचा अद्याप खुलासा झाला नाही. गेल्या वर्षभरात ते कधीही एकमेकांबरोबर दिसले नव्हते. त्यामुळे अचानक ते एकत्र दिसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, टायगर श्रॉफ लवकरच ‘बडें मियां छोटे मियां’ या सिनेमात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तर दिशा पाटनीचा ‘योद्धा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



