Rohit Pawar : विमान अपघात प्रकरणावर राज ठाकरेंसोबत चर्चा; भेटीनंतर रोहित पवारांनी दिली महत्वाची माहिती
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चर्चा करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

Rohit Pawar : अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेटी घेतली. या भेटीत रोहित पवारांनी विमान अपघाताबाबत उपस्थित केलेल्या शंका राज ठाकरेंना सांगितल्या. राज ठाकरे यांनी देखील रोहित पवार यांच्याकडून संपूर्ण माहिती समजावून घेतली. जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
या भेटीनंतर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज ठाकरे यांना अजितदादांच्या विमान अपघाताची माहिती दिली. मी दिलेली सर्व माहिती राज ठाकरेंनी समजून घेतली. गुन्हा दाखल होत नाही, ही दुर्देवी बाब असल्याचे राज ठाकरे म्हणाले असे रोहित पवारांनी सांगितले.
अपघाती मृत्यू असला तरी FIR नोंदवता येतो हा नागरिकांचा अधिकार आहे आणि काहीही झाले तरी पोलिसांना FIR नोंदवावा लागतो असे २ दाखले त्यांनी दिले. दादांसोबत त्यांनी जवळून काम केले आहे. जेव्हा वेळ मिळायचा आम्ही भेटायचो अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितले असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.
मा. राज ठाकरे साहेब हे राज्यातील एक लोकप्रिय नेते असून त्यांना मानणारा राज्यात एक मोठा वर्ग आहे. आज त्यांची भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांना पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्याही मनात असलेल्या काही प्रश्नांविषयी चर्चा केली. यावेळी माझे मित्र… pic.twitter.com/9aOaLHGD1y
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 27, 2026
योगायोगाने आज मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी माणसांसाठी राज ठाकरे सातत्याने लढत आले आहेत. त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातूनही कार्यकर्त्यांच्या मदतीने या विषयाला न्याय मिळाला पाहिजे.
तुम्ही पाठिंबा आणि ताकद द्यावी अशी मागणी रोहित पवारांनी राज ठाकरेंकडे केली आहे. त्यावर दादांना न्याय कसा मिळेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल असा शब्द राज ठाकरेंनी दिला.
रोहित पवार पुन्हा पत्रकार परिषद घेणार
अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत असून केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या AAIB चा प्राथमिक अहवाल येईल आणि या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे. येत्या सोमवारी आम्ही आमच्याकडे आलेली नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहोत, त्यामुळे भूतकाळातील इतर घटनांप्रमाणे थातुरमातूर अहवाल देण्याचा प्रयत्न AAIB नक्कीच करणार नाही, ही अपेक्षा! अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्सवरून केली आहे.
हेही वाचा : SUPREME COURT: ‘आयोग बंगाल SIR मधील न्यायाधीशांना प्रशिक्षण का देतंय?’; टीएमसीचा प्रशिक्षणावर आक्षेप




