पुष्पा २ ला एक महिना पूर्ण होताच गेम चेंजर हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाला. एका महिन्याच्या काळात बॅाक्स अॅाफिसवर पुष्पा २ पुढे कोणताही सिनेमा टिकला नाही. पण गेम चेंजर याला अपवाद आहे. १० जानेवारीला रिलीज झालेल्या या सिनेमाने अवघ्या पाचच दिवसांमध्ये १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मात्र, यावर या सिनेमाचे दिग्दर्शक शंकर यांनी सिनेमाच्या कलेक्शनबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
मीडिया रिपोट्सनुसार, एका मुलाखती दरम्यान एस. शंकर यांनी गेम चेंजरच्या बॅाक्स कलेक्शनबद्दल निराशा व्यक्त केली आहे. या सिनेमातील अनेक दृश्य वेळेअभावी कापली गेल्याची त्यांनी सांगितले आहे. सिनेमाच मूळ फुटेज पाच तासांहून अधिक काळ चालले होते, मात्र सिनेमा पुन्हा दुरुस्त करण्यासाठी महत्वाचे भाग कापण्यात आले होते. गेम चेंजर हा एक अॅक्शनपट सिनेमा आहे. तेलुगू, हिंदी, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
या सिनेमात अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत, तर अंजली, एसजे सूर्या आणि श्रीकांत देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या सिनेमाची कथा राम नंदन(राम चरण ) भोवती फिरते. एका प्रमाणिक सरकारी अधिकाऱ्याची कथा गेम चेंजर सिनेमात दाखवण्यात आली आहे.
अन्यथा स्वःताची गेम
राम चरण याची मुख्य भूमिका असलेला गेम चेंजर हा सिनेमा तब्बल ४५० कोटींच्या मोठ्या स्केलवर तयार करण्यात आला आहे. सिनेमातील गाण्यांच्या चित्रीकरणावर ५० कोटींहून अधिक खर्च करण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. १० जानेवारीला रिलीज झालेल्या गेम चेंजर सिनेमाने पाच दिवसांमध्ये १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र, सिनेमाचे बजेट ४५० कोटी रुपये असल्याने अजून काही दिवस गेम चेंंजरकडे प्रेक्षक खेचला जायला हवा अन्यथा गेम चेंजर स्वःताची गेम करेल.