Ruchi Gujjar : सोशल मीडियावर एक मुंबईतील थिएटरमधील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. मुंबईतील एका चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान मोठा राडा झाला आहे. ‘सो लॉन्ग व्हॅली’ या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अभिनेत्री रुजी गुज्जर हिने चित्रपटातील अभिनेता आणि दिग्दर्शक मान सिंग यांना चप्पलीने मारहाण केली आहे. मुंबईतील सिनेपोलिसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला होता. अभिनेत्री रुची गुज्जर हिने केलेल्या दाव्यानुसार आर्थिक अडचणींमुळे तिने असे कृत्य केल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रुची दिग्दर्शकासोबत वाद घालत ओरडताना दिसत आहे. यानंतर अचानक तिचा राग अनावर होतो आणि थेट चप्पने दिग्दर्शकाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. नेमकं प्रकरण काय? अभिनेत्री रुची गुज्जर हिने केलेल्या दाव्यानुसार, गेल्या वर्षी चौहान याने तिच्याशी संपर्क साधून हिंदी टेलिव्हिजन मालिकेसाठी सह निर्मात्याची अॅाफर दिली होती. त्यानुसार तिने जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान तिच्या एसआर इव्हेट अँड एंटरटेनमेंट या कंपनीकडून २५ लाख रुपये चौहानच्या के स्टुडिओच्या खात्यांमध्ये ट्रान्सफ केले होते. मात्र, या संबंधी असणाऱ्या प्रोजेक्टचे काम पुढे सरकले नाही. View this post on Instagram A post shared by Bollywood News (@bolly_newssss) तिच्या म्हणण्यानुसार, हा निधी मालिकेसाठी नाही तर ‘सो लॉन्ग व्हॅली’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आला होता. हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याची माहिती तिला मिळाली. तेव्हा मी त्याला माझे पैसे आता परत करण्यास सांगितले, ज्यावरून त्याने मला धमकावण्यास सुरुवात केली असल्याचा गंभीर आरोप रुजी गुज्जर हिने केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा चव्हाण या व्यक्तीविरोधात दाखल केला आहे. कोण आहे रुची गुज्जर? राजस्थानमधील गुर्जर कुटुंबात जन्मलेली रुची गुर्जर ही एक मॉडेल आहे. २०२३ मध्ये तिने मिस हरियाणा हा किताब जिंकला. ती जब तू मेरी ना सही आणि हेली मे चोर सारख्या म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. या वर्षी रुचीने मेट गालामध्ये तिच्या पारंपारिक लूकने लक्ष वेधले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र असलेल्या तिच्या दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.